SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला अंमली पदार्थ गांजा…
जागतीक अमंली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने पकडला अंमली पदार्थ गांजा….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(26)जुन हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हनुन सर्वत्र साजरा केला जाते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने सर्व स्तरावर तो साजरा केला गेला एकीकडे काही समाजकंटक लोक याला खिळ लावतांना दिसतात तरी वर्धा पोलिस दल हे त्याचेवर कार्यवाही करुन त्यांचे कंबरडे मोडतांना दिसताय
अशाच समाजकंटक लोंकावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथक शहर परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की एक संशयीत ईसम दुचाकीवरून काही तरी संशयास्पद घेऊन जात आहे अशी सदरची माहीती वरीष्ठांना देवुन सदर ईसमावर कार्यवाही करीता सावजी नगर, कारला, वर्धा येथे माहीती प्रमाणे पाळत ठेऊन सदर ईसम हा त्याचे दुचाकी मोपेडवर काळया रंगाची बॅग पायदानावर ठेऊन येतांना दिसला
यावरून सदर संशयीत ईसमावर नाकेबंदी करून रेड करुन त्यास ताब्यात घेऊन त्याचे जवळील बॅगची तपासनी केली असता त्यात अंमली पदार्थ ओलसर गांजा मिळुन आला सदर ईसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) नयन दत्ताजी कडु वय 26 वर्ष रा. सहयोग कॉलोनी कारला रोड पिपरी मेघे, वर्धा असे सांगीतले तसेच त्याचे ताब्यातुन 1) अंमली पदार्थ ओलसर गांजा एकुन 10 की.ग्रॅम प्रती की 20,000/- रू प्रमाणे 2,00,000/- 2) एक सुजुकी ऐसेस कंपनीची निळया रंगाची मोपेड गाडी एम. एच 32 ऐ. व्ही 2899 कि. 1,00,000/- रू 3) गोल्डन रंगाचा कि -पॅड वाला साधा मोबाईल कि. 1000/- रू 4) एक ओप्पो कपंनीचा निळसर रंगाचा ॲन्डराईड मोबाईल कि. 10,000/- रू असा एकुन 3,11,000/- रू चा माल मिळुन आल्याने नमुद आरोपीस सदर मिळुन आलेल्या अंमली पदार्थ गांजा बाबत विचारपुस केली असता त्यांनी गांजा हा सम्यक उर्फ अंकित अरून धवने रा. अवचित बाबा मंदीर जवळ, पिपरी मेघे ता. जि. वर्धा यांने आणुन दिल्याचे सांगीतले
त्या वरून नमुद आरोपी याचा सुध्दा सदर गुन्हयात सहभाग दिसुन येत असल्याने आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात आली आहे तसेच आरोपी क्र 1 नयन दत्ताजी कडु याचेवर यापुर्वी सुध्दा बरेच गुन्हे नोंद आहेत यावरुन सदर दोन्ही आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन सांवगी मेघे येथे अपराध क्रमांक 435 / 2024 कलम 20, 22
अंमली औषधीद्रव्ये व मनाप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 (एनडीपिएस) अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.
स्टे. सावंगी मेघे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे याचे विशेष मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद के. मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक पराग पोटे ठाणेदार वर्धा शहर, सपोनि संदीप कापडे, पोउपनि परवेज खॉन, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे,पोशि मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, तसेच पोलिस स्टेशन सांवगी मेघे येथील
पोहवा सतीष दरवरे, प्रविण बोबडे, निलेश सडमाके, अनिल वैद्य, पो.अ. निखील फुटाने यांनी केली