
SDPO वर्धा यांचे विशेष पथकाची कामगिरी,दुचाकीवरुन शहरात येणारी विदेशी दारुची खेप पकडली…
उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाने सावंगी टी. पांईट येथे नाकेबंदी करून,दुचाकीवरुन शहरात येणारी दारुची खेप पकडली 1,33,100 रू चा मुद्देमाल केला जप्त…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 22 फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकास गोपनिय माहीती मिळाली की, पुलगाव येथुन हायवे रोडने वर्धा येथे दोन इसम त्यांचे ताब्यातील एक काळ्या रंगाची अॅक्टीवा कंपनीची मोपेड एम. एच. 32 ए.वाय. 4322 ने विदेशी दारूचा माल घेवुन वर्धा येथे घेवुन येत आहे. अशा माहीतीवरुन उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथकाने सावंगी टी पाईट वर्धा येथे नाकेबंदी करून 1) विधीसंघर्षीत बालक रा. वार्ड न. 3 बडे प्लॉट पुलगांव ता. देवळी जि. वर्धा 2) अनुराग प्रविणराव देवगडे वय 18 वर्ष रा. वार्ड न. 03 मानवटकर लेआउट, सिध्दी विनायक मंगल कार्यलय जवळ नाचनगांव पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याचेवर प्रोव्हीशन रेड करुन त्यांचे ताब्यातुन 1) एक काळया रंगाची जुनी होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोपेड क्रमांक एम.एच. 32 ए.वाय. 4322 की. त्या गाडीचे डीक्की मध्ये व पायदाना जवळ एका प्लॉस्टीक चुगंडी व कापडी बॅग मध्ये 180 एम.एल.च्या रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारू, 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस ब्लु कंपनीच्या विदेशी दारू 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला शिश्या, एक काळ्या रंगाचा नोकीया कंपनीचा अॅन्डराईड मोबाईल असा एकुन 1,33,100/- रू चा माल विना परवाना अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जागीच मौक्का जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.


तसेच नमुद दोन्ही आरोपीं विरुध्द पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे 1) अपराध क्रमांक / 2025 कलम 65 ई. 77 अ, 83, म.दा.का. सहकलम 3(1) 181, 130/177 मो.वा.का अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सावंगी मेघे करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, याचे विशेष मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद के. मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाचे पो.उप.नि. परवेज खॉन,पो.हवा. अमर लाखे, पोशि पवन निलेकर, मंगेश चावरे, व मुख्य. युवा. कार्य. प्रशि योजना मधील चैतन्य धनविज यांनी यशस्वी रित्या पार पाडली.



