पोलिस अधिक्षकांचा रेती माफीयांना पुन्हा एकदा दणका,दोन कोटीचेवर मुद्देमाल जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वाळू माफियांवर वर्धा पोलिसांची धडक कारवाई; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त…

वर्धा (प्रतिनिधी) – जिल्हयात विनापरवाना अवैधरित रेती (वाळू) उपसा करणाऱ्यांवर पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी कारवाईचा बडगा उगारला असून या मध्ये 12 जणांवर कारवाई करून 2 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली आहे. याप्रकरणी समुद्रपुर पोलिस ठाण्यात सपोनि. संतोष शेगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 531/2024 कलम 420,379,34, भादवी सह कलम 3 सार्वजनिक मालमत्ता अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या मध्ये आरोपी नामे – 1) भुषण वाघमारे रा.सेलु, जि.वर्धा, 2) सतिश वाघमारे रा.सेलु, जि.वर्धा,3) सुरज झाले रा.वर्धा, 4) संदिप रामदास मदवी रा.धनोली मेघे, ता.सेलु, जि.वर्धा, 5) नामदेव गोडामे रा.सलाई पेवट ता.सेलु, जि. वर्धा, 6) चंदु साखरे रा.येराखेडी ता.सेलु, जि.वर्धा, 7) सुरज दाते रा.हिंगणी ता.सेलु, जि.वर्धा, 8) अरविंद राय, 9) महेश बहिरे, रा.दहेगाव, 10) निखिल रोकडे, रा.सिंदी, 11) संजय ससाने, रा.पारडी ता.समुद्रपुर, जि.वर्धा, 12) निखिल गोडकर आदींवर कारवाई करून यांच्याकडून 1) अशोक लेलँड कंपनीचा दहा चाकी टिप्पर एम.एच 32 ए.जे. 5588 ची किंमत 30,000,00/- रु. 2) अशोक लेलैंड कंपनीचा टिप्पर एम. एच.32 एजे 3388 काळ्या रेतीने भरलेला 30,000,00/- व रेती किंमत 20,000/- रु. 3) अशोक लेलैंड कंपनीचा टिप्पर एम. एच 32 एजे 7162 किमंत 30,000,00/- रु. 4) अशोक लेलैंड कंपनीचा टिप्पर एम. एच.32 एजे 1006 किंमत 30,000,00/- रु. 5) टाटा ए.एल 613 टर्बो कंपनिचा एम. एच 31 सि.बी. 6030 किंमत 30,000,00 /- रु. 6) एक हिटची कंपनीची एक्स 200 एल.सी. मॉडेल बिना मोचेचे पोखलँड मशिन किमंत 65,000,00/- रु. 7) एक टाटा कंपनीचा एम.एच 40 बी.ई. 6866 क्रमांकाचा जे.सि.बी. 25,000,00/- रु. 8) एक टाटा हॅरियर एम. एच 32 ए.एस 7766 किं.20,00,000/-रु. असा एकुण  किंमत 2,60,20,000/- रुपयांचा मु‌द्देमाल मिळुन आला तसेच नदीच्या पात्रात कृत्रीम रित्या एकत्रीत केलेले रेतीचो ढीग दिसुन आले. त्यापैकी रेतीचे ढीग वगळता उर्वरीत मुद्दे‌माल हा पंचासमक्ष ताब्यात घेतला गेला.



अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक नुरूल हसन, सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण उपविभाग पुलगाव,पोनि स्थागुशा,पोनि आर्थिक गुन्हे शाखा कांचन पांडे,पोउपनि. दिपक निंबाळकर पोलिस स्टेशन पुलगाव, पो.शि रामदास दराडे, पो.शि. भुषण हाडके आणि पोलीस मुख्यालय येथील क्यु आर टी पथक यांनी केली आहे.



सदर छापा कार्यवाही नंतर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने पुढील कार्यवाही रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, कांचन पांडे पो.नि.आर्थिक गुन्हेशाखा पोनि स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!