पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडीपट्टी येथे छापा…
पोलिस अधिक्षकाचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडपट्टीत अवैध धंदे व अवैध दारुविक्री करणार्यावर छापा,लाखोचा मुद्देमाल जप्त करुन १२ आरोपींवर गुन्हे नोंद….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन वर्षाच्या आगमनापुर्वी दि 28 डिसेंबर.2024 रोजी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये दारुबंदीच्या कार्यवाही करण्याचे अनुषंगाने विशेष पथक तयार करण्यात आले. सदर पथकास पोलिस अधिक्षक यांचेकडुन मिळालेल्या विशेष सुचना व निर्देशााप्रमाणे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये विशेष मोहिम राबविण्यास आदेशीत करण्यात आले. त्या अनषंगाने परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रतिक्षा खेतमाळीस, यांचे नियंत्रणात एक विशेष पथक तयार करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील आर्वी नाका झोपडपट्टी परिसरात विशेष मोहिम राबविण्यात आली.
सदर मोहिमे दरम्यान वर्धा शहर परिसरातील आर्वी नाका वडार झोपडपट्टी येथे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे निर्देशानुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोहिम राबवून एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले व एकूण 12 आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर मोहिमे दरम्यान देशी विदेशी दारुसह अवैध दारूचा साठा एकूण किंमत 1,31,120/- रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक. अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे विशेष पथक प्रमुख परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रतिक्षा खेतमाळीस, यांचे प्रत्यक्ष हजेरीत सहा. पोलिस निरीक्षक रविंद्र रेवतकर, पोलिस अधिक्षक कार्यालय येथील कार्यालयीन स्टाफ, आर.सी.पी. पथक व पोलिस स्टेशन सेवाग्राम येथील स्टाफ यांनी केली.