
कुख्यात दारु विक्रेता शाहरुख याचे वर्धा शहर पोलिसांचा छापा,विदेशी दारुचा साठा जप्त…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वर्धा शहर डी बी पथकाची देशी विदेशी दारुचा साठ्यावर छापा टाकुन मुख्य आरोपीसह,देशी विदेशी दारुचा साठा केला जप्त….


वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी निवडनुक ही शांततेत पार पडावी याअनुषंगाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिल्या होत्या

त्यानुसार वर्धा शहर डी बी पथक पोलिस स्टेशन वर्धा शहर परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे करता पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर मिळाली मिळाली की, इतवारा बाजार बुरड मोहल्ला,वर्धा येथे राहणारा कुख्यात दारू विक्रेता शाहरुख बेग हा त्याचे राहते घरी विदेशी दारू बाळगून तिची चोरून लपून विक्री करीत आहे

अशा माहितीवरून त्याच्यावर छापा टाकून त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घराचे घर झडतीत वेगवेगळ्या कंपनीचा 55 प्रकारचा विदेशी दारूचा साठा कि 2,42,200/- रु तसेच दोन फ्रिज किंमत 30,000/- रु, एक मोबाईल कि 10,000/- रुपये असा एकुन किंमत 2,62,200/रुपये चा मुद्देमाल मिळून आला,यावरुन सदर आरोपी शाहरुख बेग यास ताब्यात घेऊन त्याचेवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर, परिविक्षादिन पोलिस उपअधिक्षक प्रतीक्षा खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरीक्षक पराग पोटे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पोउपनि शैलेश जगताप, पोहवा शैलेश चापलेकर , किशोर पाटील, पंकज भरणे ,प्रशांत वंजारी, विजय पंचटिके,नापोशि पवन लव्हाळे, नरेंद्र कांबळे,पो शि नंदू धुर्वे, शिवा डोईफोडे, श्रावण पवार, समीर खोब्रागडे, वैभव जाधव सर्व पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी केली


