मंत्रोपचार करुन तुमचा आजार बरा करतो अशी बतावनी करुन आर्थीक फसवणुक करणार्या राजस्थान येथील टोळीस वर्धा शहर पोलिसांनी केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जादुटोण्यावर उपाय करून लोकांच्या आजारपणाचा उपचार करण्याची बतावनी करुन त्यांची आर्खिक फसवणुक करणाऱ्या टोळीला  वर्धा शहर पोलीसांनी केले जेरबंद….





वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१८ फेब्रुवारी  रोजी यातील फिर्यादी प्रकाश पुंडलीकराव शिंदे, वय ६५ वर्ष, रा. सुदामपुरी, डॉ सचिन अग्रवाल यांचे हॉस्पीटलचे मागे वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की ते दि १७ रोजी सकाळी १०:०० वा. च्या सुमारास त्यांच्या घरासमोर कुटुंबासोबत बसुन असतांना त्यांना पाहुन एक अनोखळी पुरूष व दोन महिला असे तिघे एका विना नंबर प्लेट च्या हिरो होन्डा कंपनीच्या पॅशन मोटार सायकल ने त्यांचे घराजवळ आले होते. त्यांनी फिर्यादी प्रकाश शिॅदे यांना आमच्याकडे चमत्कारीक शक्ती असुन तुमच्या पायाचा आजार चमत्कारी शक्तीने बरा करून देतो असे सांगुन फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला. सदर अनोळखी ईसम यांनी चमत्कारी कृती करून तोंडातुन रक्तासारखे पाणी कागदावर काढुन फिर्यादी प्रकाश शिंदे यांचेकडुन ५,०००/- रू. घेतले.



त्यादरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना त्यांचे ओळखपत्र म्हणुन आधार कार्ड दाखविले तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येकाचे ३ वेगवेगळे आधार कार्ड दिसुन आल्याने फिर्यादी यांना त्यांच्यावर संशय आला की ३ महीण्यापुर्वी अशाच प्रकारे यातील फिर्यादी प्रकाश शिंदे यांची अशाच प्रकारे काही अनोळखी ईसमाने जादुटोना व चमत्कारी शक्तींनी तुमच्या पायाचा आजार बरा करतो म्हणुन ५००००/- रु ने फसवणुक केली होती त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा व्हिडीओ सुध्दा बनविला होता मागील वेळी सुध्दा अज्ञात ईसमांनीसुध्दा असाच बनाव करुन फिर्यादी यांची फसवनुक केली होती त्यांनी वरील अनोळखी इसमांचा व्हिडीयो बनवला होता व  सदरचा व्हिडीओ उपस्थित ईसमांना दाखविला असता  तेव्हा ते  तिन्ही अनोळखी  आरोपी ईसम घाबरले त्यावर फिर्यादी प्रकाश शिंदे यांनी तुमची पोलिस स्टेशन येथे तक्रार करतो असे सांगीतल्याने आरोपी यांनी सांगीतले की, तुमची फसवणुक करणारा हमारा आदमी है। हम उसके पैसे आपको वापस करते पुलीस में कम्पलेंट मत करो असे म्हणुन त्यांना रोख ५०,०००/- रू. परत दिले.



त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिस हेल्पलाईन क्र. ११२ या क्रमांकावर फोन करून पोलिसांना सदर घटनेबाबत माहिती दिल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन आरोपी  १) सलालउद्दीन अब्दुल हफीज, वय ६५ वर्ष २) अजीजन सल्लाउ‌द्दीन हफीज खान, वय ५८ वर्ष, (महीला) ३) सायरा बानो शरीफ मोहम्मद, वय ३४ वर्ष, (महीला) सर्व रा.बुंदी रा. रेगत मोहल्ला बुंदी (राजस्थान) यांना ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आनुन फिर्यादी प्रकाश शिंदे यांच्या तक्रारी वरून पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे अप. क्र. २४३/२०२५ कलम कलम ३१८(४), ३३७, ३३९, ३४०(२), ३(५) सहकलम ३(२) महा. नरबळी व ईत्तर अमानुश अनिष्ठ प्रथा जादुटोणा प्रति. कायदा सहकलम ३३(२) महा. वैद्यकिय व्यवसायी अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपींकडुन १) एक बिना नंबर प्लेट ची हिरो होन्डा कंपनीची पॅशन मोटार सायकल कि. ३०,०००/- २) ०२ लोखंडी ताबीज, ३) ०३ प्लास्टिक पन्नी ला सुत गुंडाळलेले ताबीज, आरोपी सल्लाउद्दीन हफीज यांचे जन्म तारीख ०१/०१/१९७९ असलेले आधार कार्ड आधार नंबर ३१०३६६६९१९५७ असे असलेले, ४) सल्लाउद्दीन हफीज यांचे जन्म तारीख ०१/०१/१९५७ असलेले आधार कार्ड, आधार न ३१०३६६६९१९५७ असे असलेले, ५) सल्लाउद्दीन हफीज यांचे इंडीयन युनियन ड्राव्हींग लायसन्स RI ०८ २०२४०००४८१३ नंबर असलेले, ६) अजीजन यांचे जन्म तारीख ०१/०१/१९६४ असलेले आधार कार्ड, ७)आधार नं ९४११२५०३९९४१ असे असलेले, ८) अजीजन यांचे जन्म तारीख १९७१ असलेले आधार कार्ड, आधार नंबर ९४११२५०३९९४१ असे असलेले, ९) अजीजन यांचे जन्म तारीख ०१/०१/१९६६ असलेले जन आधार कार्ड, १०) परीवार पहचान संख्या ५०२२०६७५१४ असे असलेले, ११) सायरा बानो यांचे जन्म तारीख १०/०७/१९८५ असलेले आधार कार्ड, १२) आधार नंबर ८६३२४९३८७६२५ असे असलेले, १३) ईकवाल यांचे जन्म तारीख ०१/०१/१९९२ असलेले आधार कार्ड, १४) आधार नंबर ६१८३८६४७१४९२ असे असलेले, १५) बँक ऑफ कोरीया १००० WON नोट, १६) विस्मल्लाह हिर्ररहमा निर्रहीम असे लिहलेले असलेले ०२ कार्ड, १७) उर्दू भाषेत लिहलेले असलेल्या ०३ चिट्टया १८) शरीरावर रोग असलेले व त्यावर उपचार करीत असणारे चार्ट ०२, १९) TURPENTINE OIL ची ४०० उस ची बॉटल, २०) Beverll minerals चे ५०० ml चे बॉटल मध्ये तेल, २१) ०४ पांढऱ्या रंगाचे लहान प्लास्टिक डबीत तेल, २२) ०२ पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक डबीत पावडर, २३) Dabur Arogyavardhini Gutika चे डब्बी मध्ये चिक्क्ट द्रव, २४) FAIZ JOINT RELIFE GOLD चे डब्बी मध्ये पिवळ्या रंगाच्या १० गोळया, २५) एका लहान प्लास्टिकचे बॉटल मध्ये विटकरी रंगाचे पाऊडर, २६) एका लहान प्लास्टिक बॉटल मध्ये पांढऱ्या रंगाचे पाऊडर, २७) FAIZ JOINT RELIFE OIL ची ५० उस च्या ०२ बॉटल, २८) Surkh ची १०० उस ची बॉटल, २९) एक जर्मनचा चापट डब्बा त्यामध्ये, चार पिवळया धातुच्या पुंगळ्या, एक लाल रंगाची प्लास्टिकची पुंगळी, एक स्टिलची धारधार वस्तु, एका स्टिलचे लहान डब्बी मध्ये काळया रंगाच्या विय्या, एका कागदयाचे पुडी ०४ काळया रंगाच्या बिया, कॉटन, ३०) एका लाल सोनेरी रंगाचे पिशवी मध्ये पांढव्या रंगाच्या ३७ गोळया, ३१) एक कथ्थ्या रंगाची लेदरची बॅग जुनी वापरती अं. कि. ५००/-, ३२) एक पांढऱ्या रंगाचा IAVA A3 कंपनीचा कि पेंड मोबाईल ज्याचा IMFI NO. १. ३५९५३५६२७८८९८३७, IMEI NO. २. ३५९५३५६२७८८९८४५ असा असून मोबाईल सिम नंबर ९९२८३३५१३३ असा असुन जुना वापरता अं.कि. ५००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच फिर्यादी यांचेकडुन त्यांना आरोपीने दिलेले ५०,०००/- रू जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयांतील आरोपी हे सध्या पोलिस कोठडीत आहे. गुन्हयांचा तपास सुरू आहे

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक  डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पराग पोटे, पोउपनि शैलेश जगताप, पो हवा प्रशांत बावनकर, लोभेश गाडवे, पंकज भरणे, पो.शि. समिर खोब्रागडे, दयानंद धोंगडे सर्व नेमणुक पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!