ईटेरियर डेकोरेशनच्या नावाखाली ॲानलाईन लाखोचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

इंटेरिअर डिझायनिंगच्या नावाखाली वर्धेकरांसह,पुणे येथील लोकांना लाखोंचा गंडा घालणारे दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात….

वर्धा (प्रतिनिधी) – इंटेरिअर डिझायनिंगच्या नावाखाली आरोपीने लाखो रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. वर्ध्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात आरोपीस अटक केल्याची माहिती मिळताच पुण्यात अशाच पद्धतीत फसगत झालेल्यांनी वर्धा गाठून येथील पोलिसांना माहिती दिली. फसवणूक करणाऱ्याची पद्धत, बोलणे या सगळ्याच बाबी चक्रावून टाकणाऱ्या असल्याचे सांगण्यात येते. काहींना तर पूर्ण खातरजमा करत फुंकून पाऊल टाकत असतानाही फसगतीला सामोरे जावे लागल्याची माहिती आहे.





याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भुगाव वर्धा येथील अभियंता असलेल्या एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने घराच्या इंटेरिअर डिझाईनच्या कामाकरिता निवड केली. निवड केलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडून काही रक्कम उकळली मात्र त्यानंतर काम करण्यास चालढकल केली. फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर ईसमाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हाची नोंद करुन तपास सुरु केला व सदर गुन्ह्याच्या संबंधाने तांत्रीक विश्लेशन करुन पुण्यातुन अभिषेक व राहुल नामक  दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन  अटक केली. महत्वाचे म्हणजे सदरचे आरोपी हे सारखे आपले ठिकाण बदलवित होते तसेच पुणे पोलिस सुध्दा त्यांचे मागावर होते हे विशेष सदरच्या आरोपींना अटक  झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पुण्यात फसवणूक झालेल्या व्यक्तींनी वर्धा गाठून पोलिसांना याबाबत माहिती दिली तसेच पुण्यात देखील अशा पद्धतीने फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे येत आहेत



आरोपीची हायप्रोफाईल लाईफस्टाईल असून किरायाने महागडा बंगला, महागड्या चारचाकी वाहने आहेत. आरोपी या कामात निष्णात  असल्याचे त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या संकल्पनांवरून दिसून असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या बोलण्यातून, अकाउंटवर ऑनलाइन रक्कम स्वीकारणे, तसेच दुकान, फॅक्टरीचे व्हेरिफीकेशन करायला लावणे आदी बाबींमुळे त्याच्यावर विश्वास व्हायचा. पुण्यात अशी अनेक प्रकरणे पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



वर्ध्याच्या सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पुण्याहून दोन आरोपींना अटक केली. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून आरोपींची चौकशी सुरू आहे.आरोपींविरोधात पुण्याच्या दोन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

घराचे इंटेरिअर डिझायनिंग करायचे असलेल्या व्यक्तींनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील मल्टीसर्व्हिसेस, इन्टेरिअल इन्फ्रा आणि लिवाईन डेव्हलपर्स अशा वेगवेगळ्या नावांनी असेल्या पेजेसवर संपर्क साधला. यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या पेजवर संपर्क साधला. सुरूवातीला त्याने गृहभेट देण्याकरिता पाच हजार रुपये शुल्क घेतले. तेथे त्याने घरातील डिझायनिंगविषयी चर्चा करत विश्वास संपादन केला. पॅकेज ठरवून घेतले. दुकान तसेच शोरुम पाहून खातरजमा करायला सांगितले. संबंधितांनी शोरुम तसेच फॅक्टरीची पाहणी करत खातरजमा केली. सगळ्या बाबी तपासून त्याला पैसे ऑनलाईन पद्धतीने दिले. कुणी पाच लाख, कुणी सात, तर कुणी त्यांच्या ठरलेल्या पॅकेजनुसार रक्कम दिली. त्यात एकमुस्त रक्कम दिल्यास आणखी सवलत मिळेल, असेही सांगितले. वापरासाठीच्या साहित्याची तपासणी केली असता ते खरेखुरे क्वॉलिटीचे असल्याचे आढळले. विश्वास झाल्यानंतर त्याला पैसे दिले. पण, ताक फुंकून पित असतानाही सुशिक्षितांची फसगत झाली. दुकान, फॅक्टरी बंद केली आणि त्याने त्या भागातून पोबारा केला. वारंवार संपर्क करूनही त्याने काम करून देण्यास चालढकल चालविली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी पुण्यातील विमाननगर, वानोडी येथे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. असाच प्रकार वारजे पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागातील काही जणांसोबत घडल्याचे कळते.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!