तरुणांना नोकरीचे आमिष देऊन पैसे उकळणार्या दिल्ली येथील कॅाल सेंटरवर वर्धा सायबर पोलिसांची धाड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा-  सवीस्त व्रुत्त असे की दिनांक 01.06.2023 रोजी फिर्यादी प्रांजली दिनेश चुलपार, वय 19 वर्षे, रा. सिध्दार्थनगर, बोरगांव मेघे, वर्धा व यांची आई शालू दिनेश चुलपार हिच्या मोबाईलवर फिर्यादी यांनी लोकल जॉब सर्च अपडेट नावाची अँप डॉउनलोड केली व ती अॅप उघडून त्यामध्ये फॉर्म भरला असता फिर्यादी हिला दिनांक 08.06.2023 रोजी त्यांचा मोबाईल क्र. 8806789678 वर
9990593446 या क्रमांकवरुन फोन आला व त्या वेळी त्यांनी फिर्यादी यांना सांगितले की, तुम्ही एअर ईंडियामध्ये नोकरी करीता फॉर्म भरलेला होता त्यामध्ये तुमची निवड झालेली आहे असे सांगून फिर्यादी यांना विश्वासात घेवून मो.क्र. 880694308, 990593446, 9599868404, 9990873385,9990860329 चे अज्ञात मोबाईल धारकांनी वारवांर फिर्यादी यांचेशी संपर्क करुन फॉर्म भरण्याकरीता फी, फाईल पास करण्याकरीता रक्कम, जॉयनींग लेटर पाठविण्याचे कारणाने रक्कम असे सांगून एकूण 89,500 /- रू फोन- पे आयडी authorityofindia239@okicici विक्रम मल्होत्रा (9205646590@ybl) व स्टेट बँक ऑफ इंडीया खाते क्र. 11176901139 वर भरायला लावले. गुन्हयातील अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी प्रांजली दिनेश चुलपार, वय 19 वर्षे, रा. सिध्दार्थनगर, बोरगांव मेघे, वर्धा यांना नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक केल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 03 / 2023 कलम 419, 420, भादंवि सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून  पोलिस अधिक्षक नुरुल  हसन यांनी सदर गुन्हयात अधिक बारकाईने तपास करण्याकरीता व अज्ञात स्थळावरून चालत असलेल्या नोकरीचे आमीष दाखवुन लूबाडणा-या खोट्या कॉल सेंटरची पाळेमूळे शोधून काढण्याकरीता विशेष लक्ष देवुन तपासी अधिकारी व सायबर पो.स्टे. चे कर्मचारी यांना मागर्दशन केले. गुन्हयाचे संबंधाने जूजबी तांत्रीक माहिती काढून सदर गुन्हा हा फरीदाबाद हरीयाणा व बदरपूर, साउथ दिल्ली या भागातून झालेला असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. त्यावरून पो.उप.नि. सिनूकूमार बानोत, पो.स्टे. वर्धा शहर सोबत पो. हवा. कुलदीप टांकसाळे, पो. हवा. निलेश तेलरांधे, ना.पो. शि. अमीत शूक्ला, ना.पो.शि. अनूप कावळे यांना दिल्ली येथे तपासकरीता रवाना करण्यात आले. सतत 7 दिवस केलेल्या तपासाअंती गुन्हयात वापरण्यात आलेले सीम कार्ड व बँक अकाऊंट ज्या विक्रम मलहोत्रा, रा. डीए 1905, डबूआ कॉलनी, फरीदाबाद, हरीयाणा याचे नावाने आहेत हा व्यक्ती अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने स्वतःची ओळख लपविण्याकरीता खोटे आधार कार्ड व पॅन कार्ड तयार केलेला आहे. त्यामूळे फरीदाबाद हरीयाणा व बदरपूर, साउथ दिल्ली येथे बातमीदार नेमून व संबंधीत पोलिस ठाणे येथून योग्य ती मदत घेवून त्यांचा शोध घेण्यात आला. मोलारबाद एक्सटेंशन, मोहन बाबा नगर, ताजपूर रोड या पो.स्टे. बदरपूर साऊथ दिल्ली या परीसरातील पाहणी व शोध दरम्यान काढण्यात आलेल्या माहितीप्रमाणे मेन ताजपूर रोड, भारत पेट्रोलपंपला मागच्या बाजूस, मोहन बाबा नगर, बदरपूर असलेल्या 2 मजली इमारतीमध्ये पहील्या माळयावर ईझीगो नावाचे कंपनीच्या आतमध्ये अनेक महिला व पूरूष लोन, जॉब फॉड, क्रेडीट कार्ड या कारणाने त्यांना दिलेल्या यादी प्रमाणे फोन करीत असून त्यांना रक्कम जमा करावयास लावतात अशी
माहिती मिळाली. याप्रमाणे शहानीशा व खात्री करून सदर ठिकाणी छापा घालण्यात आला. छाप्यादरम्यान फसवणूकीचे कॉल करण्यात येत असलेले एकूण 26 मोबाईल फोन, 7 चार्जर, इंटरनेट वापरकरीता असलेले राऊटर, फसवणूक करण्याकरीता लोकांशी काय बोलयाचे आहे याची नोंद असलेले रजिस्टर, आरोपीने खोट्या कंपनीच्या नावाने जस्ट डायल या प्रस्थापित कंपनीकरीता घेतलेली सामान्य नागरीकांचे नांव, मोबाईल नंबर, पॅन कार्ड यांची यादी असा किंमत 2,35,900 /- रू चा माल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. यात आरोपी 1) आकाश सुभाष सहानी, वय 30 वर्ष राहणार डी – 48, गली नंबर 1,) मोहन बाबा नगर, बदरपूर, दिल्ली 2) राकेश रामप्रकाश राजपूत वय 26 वर्ष राहणार ए-67, गली नंबर 2 मिठापूर
एक्स्टेंशन, बदरपूर, दिल्ली यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना गुन्हयांसंबंधाने अधिक विचारपूस केली व गुन्हयातील फसवणूकीची एकूण रक्कम रूपये 89,000/- आरोपींतांकडून जप्त करण्यात आले. याप्रमाणे सदर गुन्हयात जप्त मुद्येमाल व फसवणूकीची रक्कम असा 3,24,000/- रूचा माल जप्त करण्यात आला. घटनास्थळी मिळून आलेल्या कॉल सेंटरचे काम करणाऱ्या 7 महिलांना तपासार्थ हजर होण्याकरीता नोटीस देण्यात आलाी आहे.


सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नुरुल  हसन, अपर पोलिस अधिक्षक डॉ.  सागर रतनकूमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे व सहा. पोलिस निरीक्षक संदिप कापडे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि सिनूकूमार बानोत व पोलिस अंमलदार दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, मिना कौरती, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे,
अंकीत जिभे, स्मिता महाजन सर्व नेमणुक सायबर सेल, वर्धा व पोलीस अंमलदार वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रंजीत जाधव, अनुप राऊत, अमित शुक्ला, लेखा राठोड, प्रतिक वांदिले सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन, वर्धा यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!