हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,आरोपी पसार…
हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,वाहनांसह 5 लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त वाहनचालक फरार….
हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 24 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला आपले दैनंदिन कामकाज करीत असतांना बातमीद्वारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक ईसम पांढऱ्या रंगाच्या रिट्ज गाडीने ज्यांचा क्रमांक MH 02 BM 6447 हा आहे तो या क्रमांकाच्या गाडीने वडनेर मार्गे हिंगणघाट शहरात दारुसाठा आणनार आहे,
अशा खात्रीशीर माहीतीवरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार सुमेध आगलावे यांनी सदरची बातमी पोलिस निरीक्षक मारोती मुळुक यांना देऊन सोबतीला पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम व पथकातील ईतर सहकार्याना घेऊन मिळालेल्या माहीतीवरुन वर्धा व वडनेर कडे जाणाऱ्या रस्त्यावर महाकाली नगरी,हिंगणघाट येथे पाळत ठेऊन सदर वाहन यायची वाट बघीतली काही वेळानंतर दुपारी 4.30 ते 5.00 वा चे दरम्यान सदर क्रमांकाचे वाहन येतांना दिसताच पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम व पोलिस हवालदार सुमेध आगलावे एका बाजुला व दुसर्या बाजुला पो हवा अजहर खान,नापोशि राहुल साठे,पोशि आशिष नेवारे,अमोल तिजारे यांनी गाडीला थांबायचा ईशारा केला असता पोलिसांना पाहुन वाहनचालक गाडी तिथेच टाकुन जवळच्या झाडीझुडपाचा फायदा घेऊन पसार झाला सदर गाडीची तपासनी केली असता त्यात मागच्या सिटवर व मागील डिक्कीत 7 स्टार डिस्टिलरिज देशी दारू लिहून असलेल्या सिलबंद खरड़याच्या एकूण 20 पेट्या प्रति पेटीमध्ये 90 ml च्या 100 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या किंमत 100/-₹ प्रती बाटली या प्रमाणे एकूण 2,000 सिलबंद बाटल्या ज्याची अंदाजे किंमत 200000/-₹ व मारोती सुजुकी कंपनीची सिल्व्हर रंगाची रिट्ज गाडी क्रमांक MH- 02 BM 6447 अंदाजे किंमत 300000/-₹ असा एकुन 500000/-₹ चा मुद्देमाल जप्त केला व अज्ञात आरोपीविरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करुन फरार असलेला चालक/आरोपी याचा शोध सुरु आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक डॅा सागर कवडे यांचे आदेशाने तसेच उप विभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनाखाली,पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांचे निर्देशानुसार पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पो. हवा. सुमेध आगलावे, अज़हर खान, नापोशि राहुल साठे, पोशिआशीष नेवारे, अमोल तिजारे यानी केली.