JCB चोरीप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी २ आरोपी मध्यप्रदेश येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अतिशय क्लिष्ट अशा JCB चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात हिंगणघाट पोलिसांना यश आले,कुठलाही पुरावा नसतांना फक्त गुन्ह्यांत वापरलेली कार यांचेवरुन सदर गुन्ह्यातील आरोपी पर्यंत पोहचण्यास पोलिसांना मदत झाली JCB चोरीचे अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारतां येत नाही….

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 28/12/23 रोजी  फिर्यादी अमोल मधुकरराव ठोंबरे यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे येऊन  तक्रार दिली कि, दिं.27/12/2023 चे सायंकाळी 07/00 वा. चे सुमारास फिर्यादी यांच्या मालकीचा JCB क्र. MH 32 AS 0676 कि. 27,00000/- हा फिर्यादीचे आँपरेटर ने फिर्यादीचे आँफीस समोर उभा केला होता. तो दि. 28/12/2023 चे सकाळी 08/00 वा. JCB आँपरेटर यांना दिसला नाही वरुन फिर्यादी व आँपरेटर यांनी हिंगणघाट शहर व आजुबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला तो तो त्यांना मिळुन न आल्याने पोलिस स्टे्टेशन हिंगणघाट येथे त्यांच्या लेखी  तक्रारीवरुन अप क्र.1613/2023 कलम 379,34 भा.द.वी. अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला





सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्ह्याचा तपास हा पोलिस निरीक्षक मारोती मुळक ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट  यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथक १ यांचेकडे देण्यात आला व त्यांनी सदरचा तपास तांञीक रित्या सुरु केला असता. JCB चे GPS अज्ञात चोरट्यांनी  कापल्याने त्याचे लोकेशन मिळु शकले नाही. परंतु सदर गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन यावरुन गाडीचे मालकाचा शोध घेऊन सदरचे चारचाकी वाहन हे मध्यप्रदेश येथील असल्याने तांञीक रित्या व मुखबीर खबरेवरुन राज्य मध्यप्रदेश येथे रवाना होवुन आरोपी आरोपी क्र.



01) जैकम ईलीयास खान वय 34 वर्ष रा. कुसपूरी ता. रामगढ जि. अलवर राज्य राजस्थान ह.मु. सतवास जि. देवास राज्य मध्यप्रदेश 02) मोहम्मद शौकीन मोहम्मद यासीन वय 20 वर्ष रा.लोहिंगा कला 165 मेवात ता. पन्नाना जि. नुहू राज्य हरियाणा



यांना तब्यात घेवुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या JCB बाबत विचारपुस करुन ग्राम निमासा ता. सतवास जि. देवास राज्य मध्यप्रदेश येथुन शिताफीन् गुन्ह्यात चोरी गेलेला JCB क्र. MH 32 AS 0676 कि. 27,00000 /- व गुन्हा करतांना वापरलेली मारुती अल्टो 800 क्र. MP 09 WM 4669 कि.3,00000 /- , दोन मोबाईल कि.20,000/- असा एकुण 3,020,000/-मुद्देमाल जप्त करुन सदरचा गुन्हा 48 तासाचे आत गुन्हे प्रकटीकरण पथक १ ने उघडकीस  आणला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नृरुल हसन ,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक .मारुती मुळुक ठाणेदार हिंगणघाट याचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथक .प्रमुख पो.हवा.सुमेध आगलावे,अजहर खान ना.पो.शि.राहुल साठे,अनुप कावळे सायबर सेल वर्धा,पो.शि.आशिष नेवारे,अमोल तिजारे, यांनी केला असुन गुन्हाचा पुढील तपास स.पो.नी. अनिल आळंदे, पो.हवा. किशोर कडु  करीत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!