
चाकुचा धाक दाखवुन लुटणार्यास हिंगणघाट पोलिसांनी केली अटक..
चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अटक……
हिंगणघाट(वर्धा) – हिंगनघाट पोलिस स्टेशन हद्दीत चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दुकानात खरेदी साठी गेलेल्या एका इसमाला खिशातील नोटांचे बंडल काढून खरेदी करत असताना चोरट्यांनी बघितले नंतर त्याला जबरदस्ती लांब घेऊन जाऊन चाकूचा धाक दाखवून मारहाण करून रोकड लंपास केली.


या बाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.17डिसेंबर) रोजी सकाळी 07 वा चे सुमारास फिर्यादी हे त्यांच्या आजेसासु याचा राखड शिरवण्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी हे हिंगणघाट स्मशानघाट येथे गेले असता त्यांना भुख लागल्याने त्यांनी शेजारील दुकानात जाऊन खिशातील नोटांचे बंडल काढून चिप्स पॅकेट खरेदी करीत असताना दुकानावर बसलेल्या 2 अनोळखी ईसमांनी फिर्यादीला चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन जबरीने मोटारसायकलवर बसवुन वणा नदीचे घाटावर विठ्ठलाचा मुर्तीचा समोर नेवुन त्यांना चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन फिर्यादीचे खिशातील नगदी 27000/-रु काढुन नेले असे फिर्यादीने (दि.19डिसेंबर) रोजी पो.स्टे. हिंगणघाट येथे येऊन दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. हिंगणघाट येथे अप क्रं 1578/23 कलम 365,392,34 भा.द,वी अन्वये गुन्हा नोंद केला, होता. नमुद गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषन पथक यांनी सुरु केला असता नमुद गुन्हा हा चार ईसमांनी मिळुन केल्याचे गुप्त बातमी दाराकडुन माहिती पडताच निशानपुरा वार्ड येथील राहणारा चंद्रकांत उर्फ जागो काळे यास ताब्यात घेवुन त्याला कसोशिने विचारपुस केली असता विचारपुस दरम्यान त्यांने नमुद गुन्हा शेख आसीफ शेख जब्बार, मोहम्मद इरफान, रमेश उर्फ रामा तिवाडे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिल्याने आरोपीतानकडुन गुन्ह्यात लुटलेली रक्कम पैकी 16000/-रु नगदी, गुन्ह्यात वापरलेली हिरोहोन्डा पैंशन प्रो-मोटारसायकल MH-32-AL-6418 किं. 30000/-व गुन्ह्यात वापरलेला चाकु किं. 100/-रु असा एकुण 46100/-रु. चा माल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मारुती मुळुक ठाणेदार हिंगणघाट यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पो. हवा. सुमेध आगलावे, अजहर खान नापोशि राहुल साठे, पोशि. आशिष नेवारे, अमोल तिजारे, यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि रमेश मिश्रा, पोशि दिपक हाके करत आहेत.



