वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्य करुन मैत्रिनीच्या बहीनीच्या घरी मित्राच्या सहकार्याने केली चोरी,अन् डाव फसला…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

हिंगणघाट(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17.11.2023 रोजी फिर्यादी

वृषाली रमेश सुरकार, वय 24 वर्षे, रा. ज्ञानेष्वर वार्ड, हिंगणघाट





या आपले परीवार व मित्रासह रात्री 08.30 वा. घराला कुलूप लावून वाढदिवसाच्या निमित्ताने जेवण करण्याकरिता हॉटेल मध्ये गेल्या होत्या. जेवण करून रात्री 09.45 वा. त्या घरी परत आल्या तेव्हा त्यांना घराला लावलेले कुलूप दिसून आले नाही. आत मध्ये जाऊन पाहिले असता पडलेल्या असता व्यस्त सामानावरून त्यांना त्यांची घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामध्ये त्यांनी टेडी बिअर मध्ये ठेवलेले नगदी 5,00,000/-रु, आलमारीतील नगदी 2,00,000/-रू, फ्रिज वर ठेवलेले छोटया पर्स मधील



1) छोटे सोन्याचे मंगळसुत्र वजन 5 ग्राम किंमत 25,000/- रू



2)5 ग्राम वजनाचे दोन सोन्याचे गोफ किंमत 40,000/- रू

3) एक ग्राम वजनाची सोन्याची नथनी किंमत 4,000/- रू

4 ) एक ग्राम वजनाच्या दोन जिवत्या किंमत 8,000/-

5) एक विवो कंपनीचा  अँड्रॉइड मोबाईल कि 11,000/- रू

असा एकुण जुमला किंमत 7,88,000/- रू चा मुद्देमाल चोरी
गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे येवून दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून अप क्र. 1396/23 कलम 457, 380 भांदवि प्रमाणे नोंद करण्यात आला होता. सदर घरफोडी ही मोठया स्वरूपाची असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचेकडून गुन्हयाचा समांतर तपास सुरू करण्यात आला होता  सदर गुन्हयाचे तपासात सर्वप्रथम कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने तसेच कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध
नसल्याने गुन्हाच्या तपास करून गुन्हा उघडकीस आणणे कठीण झाले होते. तसेच प्रकरण हे किचकट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना व आरोपिंचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील तक्रारदार यांचे बहिणीचा मित्र

सचिन अशोक पाराशर, वय 35 वर्षे, रा. रंगारी वार्ड, हिंगणघाट

अनिकेत अरूण लासटवार, वय 26 वर्षे, रा. रंगारी वार्ड, हिंगणघाट

यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही संशयित इसमांकडे सखोल व बारकाईने विचारपूस करण्यात आली. दोघांकडे केलेल्या कौशल्यपूर्ण विचारपूस माझ्यावर संशय येणार नाही या उद्देशाने वाढदिवसाची पार्टी मी माझ्याकडून देणार असे सांगून मी सर्वांना
जेवायला हॉटेल मधे घेवून गेलो व मी त्यांच्यासोबत हजर राहून माझा मित्र अनिकेत याला त्यांचे घरी पाठवून टेडी बिअर मधे ठेवून असलेले पैसे व इतर दागिने आणि मोबाईल चोरी करण्यास सांगितले. मला पैसे कुठे ठेवले आहेत यायबाबत संपूर्ण माहिती होती. चोरी झाल्यानंतर आम्ही मिळालेली रक्कम वाटून घेतली. अशाप्रकारे गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपीं अटक करून त्यांचेकडून गुन्हयातील गेलेले

सोन्या चांदीचे दागीने

1) छोटे सोन्याचे मंगळसुत्र वजन 5 ग्राम किंमत 25,000/- रू

2)5 ग्राम वजनाचे दोन सोन्याचे गोफ किंमत 30,000/-रू

3 ) एक ग्राम वजनाची सोन्याची नथनी किंमत 4,000/- रु

4) एक ग्राम वजनाच्या एक जिवती किंमत 4,000/-

5) सोन्याचे कानातले वजन 2 ग्राम वजनाचे किंमत 10,000/- रु

6 ) चांदीचे छोटया मुलांचे दागीने
एकुण वजन 55 ग्राम किंमत 3,500/- रू तसेच चोरी गेलेल्या रोख रकमेपैकी नगदी नगदी 4,52,500/- रू असा एकुण जुमला किंमत 5,29,000/- रू चा माल हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्यातील दोन्ही आरोपी हे सध्या मा. न्यायालयाचे आदेशान्वये पोलिस कस्टडी मधे असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक  वर्मा हे करत आहेत.
सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक  नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक  सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधीकारी, हिंगणघाट  रोशन पंडीत याचे प्रत्यक्ष मार्गेदर्षनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजय  गायकवाड तसेच मारोती मुळक याचे निर्देषाप्रमाणे स्थानिक गुन्हे षाखा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राम
खोत, पोलिस अंमलदार सचिन इंगोले, पिसे, रामकिसन ईप्पर, अरविंद इंगोले, अक्षय राउत तसेच पोलिस स्टेशन, हिंगणघाट येथील पोउपनि भारत वर्मा, गुन्हे प्रगटीकरन पथकाचे पोलिस अंमलदार प्रविण देषमुख, नरेंद्र डहाके, नरेद्र आरेकर, सुनिल मळनकर, सागर सांगोले, विजय हारनुर व दुर्गेश बांन्ते यांनी संयुक्तपणे केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!