विरुळ आबाजी येथील अवैध दारु विक्रेता संतोष पारीसे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
पोलिस स्टेशन पुलगाव हद्दीतील विरुळ आबाजी येथील अवैध दारु विक्रेत्यांवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगांव हद्दीतील मौजा विरुळ येथील अवैध दारु विक्रेता संतोष भिमराव पारीसे, रा. वार्ड क्र ३, आबाजी वार्ड, बाजार चौक, विरुळ, ता. आर्वी, जि. वर्धा हिचेविरुध्द पोलीस स्टेशन पुलगांव जि. वर्धा येथे सन २००३ पासुन एकुण ६५ गुन्हे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अन्वये दाखल होते. त्यापैकी १७ गुन्हे न्यायप्रविष्ट
असुन. संतोष पारीसे हा वेळोवेळी प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस संतोष हा न जुमानता अवैधरीत्या गावठी मोहा दारु, देशी विदेशी दारु, मौजा विरुळ(आबाजी), ता. आर्वी जि. वर्धा येथे विक्री करीत होता. ज्यामुळे विरुळ गावातील व परिसरातील सार्वजनिक स्वास्थास धोका निर्माण होवुन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती. तसेच विरुळ (आबाजी) परिसरातील अनेक शांतता प्रिय सामान्य नागरीकांच्या सदर ईसमाविरुध्द अनेक तक्रारी प्राप्त होत्या. ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक,पुलगाव राहुल सोनवणे, यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी,वर्धा यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांनी दिनांक २४ जुन २०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्थानबध्दास नागपुर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपुर
येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे. अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर, एमपिडीए कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा तसेच पोलिस अधिक्षक वर्धा यांनी दिलेले आहेत. यापुर्वी सुध्दा अश्याच प्रकार प्रकारच्या कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे.
सदर प्रकरणी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, पुलगांव . राहुल चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस ठाणे
पुलगांव, पोहवा अमोल आत्राम, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलिस हवा राजेंद्र हाडके, रघाटाटे, पोस्टे पुलगांव यांनी केली.