वडनेर दरोडा प्रकरणी पोलिस महानिरीक्षकांनी केले पोलिस अधिक्षक श्री नुरुल हसन यांचे कौतुक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा –  काही दिवसांआधी वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील पोहना  शिवारात सशस्त्र दरोडा टाकून चार कोटी ५२ लाखांची रक्कम लुटणाऱ्या सहा आरोपींना अवघ्या ४  तासांत अटक करून तब्बल ३ कोटी ७५  लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी
प्रमाणपत्र देत त्यांना सन्मानित केले आहे. नागपूर येथील कार्यालयातून ४ कोटी ५२ लाखांची रक्कम घेऊन
मोटारीने हैदराबादकडे जाणाऱ्यास लाल दिव्याच्या गाडीतून येऊन  पाच आरोपींनी कारचालकास मारहाण करून चार कोटी रुपयांची रक्कम लुटली होती. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी घटनास्थळी भेट देत जवळपास १०० अधिकारी व अंमलदारांची १५ पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना करून तांत्रिक तपास करीत अवघ्या ४  तासांत सर्व आरोपींना अटक करून तब्बल ३ कोटी ७५
लाखांची रक्कम जप्त केली होती. संबंधित कारवाई संपूर्ण
राज्यात पहिली मोठी कारवाई ठरली होती. त्या अनुषंगाने विशेष
पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक
नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, उपविभागीय
पोलिस अधिकारी रोशन पंडित, सहायक पोलिस निरीक्षक
दीपक वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, पोलिस
उपनिरीक्षक अमोल लगड यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करुन
त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
गणेशोत्सव, तसेच आगामी येणाऱ्या इद मिलादुन्नबी सणानिमित्त
जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस
महानिरीक्षक छेरिंग दोरजे वर्ध्यात होते. त्यांनी पोलिस अधीक्षक
कार्यालयातील हॉलमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना
आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर वर्धा पोलिस विभागाला
शाब्बासकी देत त्यांना पाठीवर कौतुकाची थाप दिली.
विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते पोलिस
अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड,
उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, सहायक पोलिस
निरीक्षक दीपक वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप
कापडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड यांना ‘बेस्ट डिटेक्शन’
अवॉर्ड देत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!