खुनाच्या गुन्ह्याची २ दिवसात केली उकल..स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा – दिनांक २२/०९/२०२३ रोजी उत्तम निरंजन वैद्य यांनी
पोलिस स्टेशन अल्लीपूर येथे तकार दिली की, दिनांक २२/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांची पत्नी सौ. अनुसया उत्तम वैद्य या नेहमीप्रमाणे सकाळी ०८:०० वा. दरम्यान शेतमजुरीचे कामाकरिता गेली होती. फिर्यादी हे सकाळी ०८:३० वा. दरम्यान गावातील बाजारात गेले होते. फिर्यादी हे सकाळी १२:३० वाजताचे दरम्यान घरी परत आले असता त्यांची मुलगी कु. शामल ही घरी संशयीतरित्या मृतावस्थेत मिळुन आली. अशा फिर्यादी यांचे तकारीवरून पोलिस स्टेशन अल्लीपूर येथे अपराध कमांक ४५६/२३ कलम ३०२ भा.दं.वि. अन्वये नोंद करण्यात आला.
सदर घटनेचे  गांभिर्य लक्षात घेता  पोलिस अधिक्षक नूरुल हसन वर्धा यांचे सुचनेवरून अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व
ठाणेदार पोलिस स्टेशन अल्लीपूर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवुन परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळावरिल परिस्थितीजन्य व तांत्रीक पुरावे गोळा करण्यात आले.  पोलिस अधिक्षक, वर्धा यांनी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व ठाणेदार पोलिस स्टेशन अल्लीपूर यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व पोलिस स्टेशन अल्लीपूर यांचे पथकाने गोपनीय तसेच तांत्रीक माहीतीचे आधारे आरोपीचे नाव निष्पन्न करून संयुक्तरित्या आरोपी शोध मोहिम सुरू करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे ०२ शोधपथक तयार करुन वेगवेगळया दिशेने रवाना करण्यात आले. त्यांनी नमुद आरोपीचा राळेगाव, कळंब, यवतमाळ, बाभुळगाव, देवगाव परीसरात शोध केला. दरम्याण मिळालेल्या
गोपणीय माहितीवरून संशयीत आरोपी हा धामनगाव रेल्वे जि. अमरावती येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून तेथे देखील शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पो. उपनि. अमोल लगड यांचे पथकाने सदर ठिकाणी मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेवुन चौकशी केली असता आरोपी याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी आशिष रमेशराव आढाऊ, वय ३४ वर्षे, रा. गणोरी ता. बाभुळगाव जि. यवतमाळ याचे व मयत शामल उत्तम वैद्य हिचे मागिल काही वर्षापासुन प्रेमसंबंध असुन शामल ही सध्या पृथ्वीराज
देशमुख नर्सिंग कॉलेज, यवतमाळ येथे नर्सिंगचे तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. दोन महिण्यापुर्वी शामल ही आपले वडिलांचे घरी अल्लीपूर येथे आली असुन सध्या ती तिथेच राहात होती. आरोपी व मयत हिचा फोनवरून संपर्क सुरू होता. मयत शामल हिने इतरत्र प्रेमसंबंध असल्याचे संशयावरून व ती आरोपोस भेटण्याचे टाळत असल्याचे रागावरून आरोपी ह्याने घटनेच्या दिवशी मयत युवती हिचे घरी येवुन वायरने तिचा गळा आवळुन तीची हत्या केली. आरोपी यास सदर गुन्हयात अटक करून मा. न्यायालयात हजर
करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक श्री डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात ,उपविभागीय पोलिस अधिकारी, पुलगाव  संजय पवार, पोलिस निरीक्षक, स्था.
गु.शा. संजय गायकवाड, ठाणेदार पोलिस स्टेशन अल्लीपूर प्रफुल डाहुले, सहायक पोलिस निरीक्षक दिपक वानखडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल  लगड, पो. हवा. हमिद शेख, चंद्रकांत बुरंगे,
खडसे, दिनेश बोधकर, ना.पो. का. मनिष कांबळे, प्रदिप वाघ, अक्षय राउत, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!