अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ९ महीण्यापासुन फरार असलेला आरोपी लागला LCB च्या गळाला…
समुद्नपुर(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 31/1/2023 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे आरोपी
1) पूजा मोहिते रा. सेवाग्राम
2) हेमा हमद रा.जाम
3) आकाश मोहिते (फरार) रा. शिवनगर ता. सेलू ,वर्धा
यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर अप क्रमांक. 82/23 कलम 20(ब) 29 NDPS अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना 10 किलो गांजा अमली पदार्थसह ताब्यात घेताना मोटर सायकल चालक आरोपी आकाश मोहिते यास पोलिस आल्याची चाहूल लागताच तो अंधाराचा फायदा घेऊन शेत शिवारामध्ये पसार झाला होता त्याचा वारंवार शोध घेणे सुरू होते परंतु तो मिळून येत नव्हता.
आज दिनांक 23/09/2023 रोजी सदर आरोपीच्या शोध संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर द्वारे माहिती प्राप्त झाली की सदर आरोपी हा आपले घरी स्वतःचे आईला व पत्नीला भेटण्याकरिता शिवनगर येथे येणार आहे. त्यामुळे त्याचे शिवनगर येथील राहते घराजवळ सापळा रचला असता यातील आरोपी आकाश रोहिदास मोहिते वय 23 वर्ष रा शिवनगर ता सेलू जिल्हा वर्धा हा येताच त्यास शिताफिने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता पो स्टे समुद्रपूर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक राम खोत, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, नितीन ईटकरे, पवन पन्नासे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.