अवैधरित्या मोहादारुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
उपविभाग आर्वी अंतर्गत स्थागुशा पथकाने पो स्टे आर्वी हद्दीत नाकेबंदी करुन अवैधरित्या मोहादारुची वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या,त्यांचे ताब्यातुन महिंद्रा स्कॉर्पिओ, गावठी मोहा दारुसह एकूण 12,82,500/- रू. चा मुद्देमाल केला जप्त…..
आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारी यांना सक्त आदेश दिले की कोणत्याही अवैध धंद्यावर कठोर आणि सक्त कार्यवाही करावी तसेच मुख्यत्वे करुन जिल्हयात होणारी अवैध दारु विक्री मग ती मोहादारु किंवा देशी विदेशी यांचे विशेष लक्ष देण्यास सांगितले त्याअनुषंगाने दि.(६)रोजी उपविभाग आर्वी येथे कार्यरत असलेले स्थागुशा पथक हे उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की शनि मंदिर वॉर्ड येथे राहणारा भावेश पाटिल त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH-32-AS-7067 ने देऊरवाडा आर्वी मार्गे मोहा दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर स्टेशन वॉर्ड , आर्वी येथे घेराव टाकुन प्रो रेड केला असता त्याच्या ताब्यातील कारमधे
1)तीन टुयब मध्ये अंदाजे 240 लिटर गवठी मोहा दारूने भरलेल्या 200/- रु. प्रमाणे कि. 48,000,/- रु.
2) 08 प्लॅस्टिक डबकी मध्ये 160 लिटर गावठी मोहा दारू की.32,000/- रू.
3) 03 रबरी टुयब ची किं. 900/- रू.
4) 08 प्लास्टिक डबकी की. 1600/- रु.
5)एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार क्र MH-32-AS-7067 *की 12,00,000/- रु.
असा एकुण कि. 12,82,500/- चा मुद्देमाल जप्त करुन,खालील आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन आर्वी येथे अप क्र.-268/24
कलम 65(अ)(ई)+83, म.दा.का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन
1) भावेश हिरामण पाटिल, वय 31 वर्ष, रा. शनी मंदिर वॉर्ड ता. आर्वी जि. वर्धा
2) विकी रतन चव्हाण वय 22 रा. स्टेशन वॉर्ड ता. आर्वी जि. वर्धा
3) राहुल संतोष राऊत ,वय 26 वर्ष,रा. स्टेशन वॉर्ड ता. आर्वी जि. वर्धा
यांना पुढील तपासकामी मुद्देमालासह पोलिस स्टेशन आर्वी यांचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांचे निर्देशाप्रमाणे पो अंमलदार भूषण निघोट, विकास अवचट, राकेश आष्टनकर , हर्षल सोनटक्के यांनी केली.