MD ड्रग तस्करास वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने केले
वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 21/0/2023 रोजी रात्रीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, डांगरी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा सचिन मिशारकर, हा पांढ-या रंगाचे चारचाकी गाडी क्रमांक MH 13 AC 9133 ने नागपुर येथुन हिंगणघाट येथील डांगरी वार्डात जाणा-या मनसे चौकात दि. 21/09/2023 चे पहाटे चे सुमारास एम.डी.(मॅफेड्रान) हा अंमली पदार्थ हिंगणघाट शहरात विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन येत आहे. अशा माहीतीच्या आधारे पोलिस निरीक्षक, संजय गायकवाड, स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात मनसे चैक, हिंगणघाट येथे सापळा रचुन बसले असता, सदरचे वाहन हे मनसे चौकात येताच त्यास शीताफीने थांबवुन गाडीचालक आरोपी – सचिन रामकृष्ण मिशारकर, वय 36 वर्श, रा. डांगरी वार्ड, समर्थ आखाडा जवळ, हिंगणघाट, जि. वर्धा यास घेराव करून ताब्यात घेवुन त्याची अंगझडती व त्याचे ताब्यातील महींद्रा रेनॅाल्ट कंपनीची लोगन कार जिचा क्र. NH 13 AC 9133 ची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये एका प्लॅास्टीक डब्बी मध्ये एकुण – 7 ग्रॅम 870 मिली ग्रॅम वजनाचा किंमत 31,480/-रु चा एम. डी. (मॅफेड्रान) पावडर हा अंमली पदार्थ तसेच त्याचे ताब्यातील कार किंमत 4,00,000/-रु व एक विवो कंम्पनीचा मोबाईल किंमत 10,000/-रु, व नगदी 3,500/-रु असा एकुण जु. किंमत 4,44,980/-रु चा मुद्देमाल जप्त करुन त्यास अटक करून त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे एन. डी. पि. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा सखोल तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक राम खोत, पोलीस अंमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, मनिश कांबळे, नितीन ईटकरे, प्रदिप वाघ, पवन पन्नासे व अखिल इंगळे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी वसंत शुक्ला पोलिस स्टेशन हिंगणघाट हे करीत आहे.