
वर्धा पोलिसांनी जप्त केला शहरात दुचाकीने येणारा दारुसाठा…
पोलिस स्टेशन सावंगी मेघे हद्दीत नाकेबंदी करुन 04 आरोपीकडून देशी विदेशी दारुसह 02 मोपेड वाहन जप्त, 2,86,600/- रू. चा मुद्देमाल जप्त…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 24 रोजी रोजी स्थागुशा पथक पो स्टे सावंगी मेघे व राम नगर परीसरात रात्र गस्त दरम्यान गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सावंगी मेघे वर्धा येथे जुना बाय पास रोड उड्डाण पूल जवळ नाकेबंदी करीत असताना 02 मोपेड गाडीवर 04 इसम हे अमरावती जिल्ह्यातून विदेशी दारूची वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून वाहने चेक करत असताना मोपेड वरील 02 इसम पोलिसांना पाहून मोपेड वाहनं देशी विदेशी दारुसह जागीच टाकून पसार झाले आरोपी टी वी एस एक्सेस मोपेड क्र MH 32 AT 5627 वर स्वार दोन इसम (पसार) यांनी घटनास्थळी टाकलेला दारूमाल 1) ऑफिसर चॉईस कंम्पनीचा 180ML च्या 72 शिश्या प्रती 300/-रू प्रमाने 21,600/-₹, 2) रॉयल स्टॅग कंम्पनीच्या 180ML च्या 42 शिश्या प्रती 350/-रू प्रमाने 14,700/-रू,3) ओसी ब्लू कंपनी च्या 180 ml च्या 22 शिष्या की प्रति 350 रु प्रमाणे 7700 रु, 4)आर सी कंपनी च्या 180 ml च्या 22 शिश्या की प्रति 350 रु प्रमाणे 7700 रु
5)टॅंगो पंच कंम्पनीच्या 180ML च्या देशी दारूच्या 30 शिश्या प्रती 100/-रू प्रमाने 3,000/-रू,6)आर एस कंपनी च्या 375 ml च्या 9 शिष्या की प्रति 700 रु प्रमाणे 6300 रु 7)एक जुनी वापरती काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड गाडी क्रमांक MH 32 AT 8828 की. 1,00,000/-रू, असा एकूण जु. की. 1,61,000/-रू चा.
व त्यामागे नाकेबंदी करुन बर्ग मन मोपेड गाडीवर 02 इसम देशी विदेशी दारूचा माल घेऊन येतांना दिसले पोलिसांना पाहताच मागे बसलेला पसार झाला चालक आरोपी 1) समीर रंजीत आकरे, वय 23 वर्ष, राहणार – मास्टर कॉलनी सावंगी (मेघे), वर्धा त्या मागे बसलेला 2) सौरभ उर्फ लल्ला यादव, राहणार – समतानगर, वर्धा (पसार) यांचे ताब्यातून 1) ऑफिसर चॉईस कंम्पनीचा 180ML च्या 24 शिश्या प्रती 300/-रू प्रमाने 8,400/-₹,
2) रॉयल स्टॅग कंम्पनीच्या 180ML च्या 24 शिश्या प्रती 350/-रू प्रमाने 7,200/-रू,
3) टॅंगो पंच कंम्पनीच्या 180ML च्या देशी दारूच्या 100 शिश्या प्रती 100/-रू प्रमाने 10,000/-रू,
4) एक जुनी वापरती काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड गाडी क्रमांक MH 32 AT 8828 की. 1,00,000/-रू, असा एकूण जु. की. 1,25,600/-रू चा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही कारवाई दरम्यान 2,86,600 /- रूपये जप्त करून सर्व
आरोपीतां विरुध्द पो स्टे सावंगी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर कारवाई नुरुल हसन,पोलीस अधिक्षक डॅा सागर कवडे अपर पोलिस अधिक्षक, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, ओमप्रकाश नागापुरे, पो.हवा. गजानन लामसे, अरविंद येनुरकर, भुषण निघोट, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप पोलिस अंमलदार मनीष कांबळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.




