नागपुर येथील महीलेकडुन स्थागुशा पथकाने जप्त केले MD ड्रग…
पेट्रोलिंग दरम्यान महिलेच्या ताब्यातुन एम.डी. (मॅफेड्रोन) अंमली पदार्थासह एकुण ८४,८००/- रू चा मुद्देमाल जप्त
केल्याबाबत…..
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाशिवरात्री व येणारे लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक ०६/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, आशु नावाची महीला ही एम. डी. (Mephedrone drug) नावाचा अंमली पदार्थ बाळगून त्याची अवैद्यरित्या विक्री करण्यांच्या इराद्याने नागठाना चौक, वर्धा बायपास रोड चिंतामणी लॉन समोर येत आहे अश्या गोपनीय खबरे वरून सापळा रचुन अत्यंत शिताफीने एन.डी.पि.एस. कायद्यान्वये कार्यवाही करून महीला आरोपी
कु. ऐश्वर्या उर्फ आशु गजानन राऊत, वय २१ वर्ष, रा. शास्त्रीवार्ड, रामटेक, जिल्हा नागपुर ह.मु. बेलतरोडी, जिल्हा नागपुर
हिचे ताब्यातुन एम. डी. (मॅफेड्रोन) अंमली पदार्थ २० ग्रॅम २३मिलीग्रॅम सह एकुण ८४,८०० /- रू चा मुदेमाल जप्त करून महीला आरोपीस एम. डी.(मॅफेड्रोन) अंमली पदार्थबाबत विचारपुस केली असता तिने सदर एम. डी. (मॅफेड्रोन) अंमली पदार्थ हे मुंबई येथून खरेदी करून वर्धा व नागपुर येथे विक्री करीता आणल्याचे सांगितल्याने महीला आरोपीसह एकुण ०३ आरोपीविरूध्द पोलिस स्टेशन रामनगर जिल्हा वर्धा येथे कलम ८ (क), २१ (ब), २९ एन.डी.पि.एस अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कारवाई नूरुल हसन. पोलिस अधीक्षक वर्धा,डॅा सागर रतनकुमार कवडे,अपर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शन व निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक कांचन पांडे ,पोउपनि उमाकांत राठोड,पोलिस अंमलदार हमीद शेख, गजानन लामसे, चंद्रकांत बुंरंगे, यशवंत गोल्हर,महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, मनीष काबंळे, गोपाल बावणकर, मंगेश आदे, गणेश खेवले, गजानन
दरणे, महीला पोलीस अंमलदार अलका कुंबलवार, निलीमा कोहळे, स्मिता महाजन, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.
एम.डी.(मॅफेड्रोन), गांजा यासारखे अंमली पदार्थ विकीबाबत कोणतीही गोपनिय माहीती असल्यास स्था.गु.शा. वर्धा येथील पोलिस निरीक्षक स्थागुशा मो.नं. ९८७०४०७४३५, पो. उपनि. उमाकांत राठोड मो.नं.९५९५४६४३१२ यांचे सोबत संपर्क करावा. माहीती देण्यार्या व्यक्तीच्या नावाबाबत गोपनियता बाळगण्यात
येईल नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.