
हिंगणघाट येथे देशी दारुची अवैधपणे विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
हिगणघाट शहरात स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांनी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्यास चारचाकी वाहनासह घेतले ताब्यात, 3,84,500/-रु चा मुद्देमाल केला जप्त….
हिंगणघाट(वर्धा) – दिनांक 21/12/2023 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, तेलंगखडी तहसील वार्ड हिंगणघाट येथे राहणारा प्रज्वल सुनील कडू हा आपल्या घरासमोर मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच 31 सी एन 7309 मध्ये अवैधरित्या देशी दारू बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे अशा माहितीवरून त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये . प्रोरेड केला असता आरोपी प्रज्वल सुनील कडू वय 20 वर्षे रा. तेलंगखडी तहसील वार्ड हिंगणघाट यांच्या ताब्यातून प्रीमियम कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम एल च्या 345 सीलबंद शीशा किंमत 34,500/- रु व एक मारुती सुझुकी कंपनीची एम एच 31 सी एन 7309 कार किंमत 3,50000/- रुपये असा एकूण 3,84,500/- रुपये चा माल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे, यांचे मार्गदर्षनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देषाप्रमाणे पोलिस हवा सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा* यांनी केली आहे.




