पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, अन्यथा कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी (दि.30 शनिवार) रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

पोलिस अधीक्षक नूरुल हसन म्हणाले की, नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उत्साही आहेत. शांतता व सुरक्षेसाठी जिल्ह्यात 46 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यासाठी 50 अधिकारी आणि 316 पोलिस कर्मचारी तैनात आहेत. जिल्ह्यात दारूची वाहतूक होऊ नये यासाठी तालुक्याच्या सिमांवरही नाकाबंदी राहणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉज आणि पर्यटनस्थळी बंदोबस्त राहणार असून प्रत्येक उपविभागात पोलिस अधिकारी आणि 110 कर्मचारी तैनात राहतील. हिंगणघाट, आर्वी आणि पुलगाव येथे स्ट्राईकींग फोर्स लावण्यात येईल. गुन्हे शोध पथकाकडून धाडीसाठी वेगवेगळे पथक तयार करतील. आरसीबीच्या पथकासह एक क्राईम इंटेलिजन्सचे पथकही तयार करण्यात आले आहे. या फौजफाट्याच्या माध्यमातून नाकाबंदी, ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच दारू तस्करांवर पायबंद घालण्यात येणार असल्याचेही हसन यांनी सांगितले. सोशल मीडियावर असामाजिक तत्त्वांच्या हालचालींवर सायबर सेलमार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे.







वर्धा पोलिसांचा वचक कायम….



वर्धा जिल्हा पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी वर्धा जिल्हा पोलिस दलाचा कार्यभार स्विकारल्यापासून गुन्हेगारांवर कारवाई करुन त्यांच्यावर वचक निर्माण केलेला आहे म्हनुनच की काय सरत्या वर्षात व वर्षभरात  वर्धा पोलिसांनी सन 2022 पेक्षा अधिक प्रभावी कारवाई केल्याचे सांगताना हसन म्हणाले की,यावर्षी 108 जणांना तडीपार करण्यात आले. दारू विक्रीत यावर्षी 7256 प्रकरणात 22 कोटी 3 लाख 12 हजार 391 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 277 जणांना शिक्षा करण्यात आली. जुगार कायद्यान्वये 688 प्रकरणात 1 कोटी 65 लाख 51 हजार 796 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रेती चोरीच्या गुन्ह्यामध्ये यावर्षी 163 प्रकरणांमध्ये 40 लाख 90 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाईत सन 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये 579 गुन्ह्यांची वाढ झाली असून तडीपार गुंडांवर 63 प्रकरणे, रात्रीच्या वेळी संशयितरित्या मिळून येणाऱ्या गुन्हेगारांवर 22 प्रकरणे अशी वाढ झाली आहे. या सोबतच खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, विनयभंग या प्रकरणांमध्येही कमालीची घट आली असल्याचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी सांगितले, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने सेवा प्रणाली, ई-दरबार, व्ही.एम. एस., सी. एम.एस. सिस्टीम, स्मार्ट ई-बिट, मुद्देमाल क्यु. आर. कोड, प्रिव्हेंटीव्ह ॲक्शन मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणालींचा समावेश करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना तक्रारी करणे तसेच या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सोयीचे झाले असल्याचेही पत्रकार परिषदेत नूरुल हसन यांनी सांगितले.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!