निवडनुकीच्या पुर्व संध्येला समुद्रपुर पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा….
समुद्रपुर(वर्धा) – जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडनुकीची धामधुम सुरु असतांना निवडनुकीच्या पुर्वसंध्येला समुद्रपूर चे ठाणेदार एस.बी. शेगांवकर यांचे मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी पो.स्टे. समुद्रपूर परीसरात धाड सत्र राबवुन विविध ठिकाणी अवैध धंद्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही केली असुन,
त्यांचेकडुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतुक व विक्री करणाऱ्या 10 गुन्हेगारांवर दारूबंदी कायद्यान्वये व अवैध सट्टा जुगार व्यवसाय
करणाऱ्या 02 गुन्हेगारांवर जुगार कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असून, एक कार, चार मोटर सायकल व फिजसह एकुण किं. 13,86,250 रू. चा माल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये
आरोपी नामे
सुरज उर्फ गोलु पुरूषोत्तम साटोणे
शंकर विठ्ठल रघाटाटे दोन्ही रा. टिळक वार्ड क 03 जाम, तह. समुद्रपूर
यांचेवर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही करून विदेशी दारू व फ्रिज सह 27,600 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी
निशांत बाबाराव ठुसे रा. शिवाजी वार्ड हिंगणघाट
यावर प्रो.रेड कार्यवाही करून त्याचे ताब्यातुन विदेशी दारू व मोटर सायकल सह 97,200 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी
दिनेश तेजमल रहेजा रा. सिंदी कॉलनी हिंगणघाट
यावर प्रो. रेड कार्यवाही करून, त्याचे ताब्यातुन विदेशी दारू व मोटर सायकल 83,600 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी
विक्की दिवाकर मसराम रा. वाघेडा तह. समुद्रपूर
शुभम उर्फ पावर हेमराज ठवरे रा. वार्ड क्र 2 समुद्रपूर
यांचेवर प्रो.रेड कार्यवाही करून देशी दारू व मोटर सायकल सह 88,000 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी
अजय वामन हजारे, वैभव बारस्कर
, प्रशांत उर्फ बंडु आंबटकर व मॉडर्न वाईन शॉप मालक
चंद्रपुर
यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात 38 पेटी देशी दारू व 03 पेटी विदेशी दारू अशा एकुण 41 पेटी देशी-विदेशी दारू चा माल व कार असा 9,97,800 रू. चा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे विजय बाबाराव धाबर्डे व अखिल अनिल जांगळेकर दोन्ही रा. आंबेडकर वार्ड जाम यांचेवर जुगार कायद्यान्वये कार्यवाही करून, त्यांचे ताब्यातुन 92,050
रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा विविध कार्यवाहीमध्ये एकुण 13,86,250 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा भय निर्माण झालेला आहे. ग्राम पंचायत निवडणुक सर्वत्र शांततेत पार पडावी याकरीता समुद्रपूर पोलिस परीसरात नियमित पेट्रोलिंग करीत, गुन्हेगारांवर सतत कार्यवाही करून, शांतता प्रस्थापित करण्याकरीता प्रयत्नशिल आहे
सदरची कार्यवाही पोलिस नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक
. डॉ सागर कवडे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांचे
मार्गदर्शनात पोलिस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. संतोष शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन
भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी केली.