
शेतशिवारातील विहीरीवरील,शेतीयंत्रावरील मोटारी चोरणार्या चोरट्यास सावंगी(मेघे)पोलिसांनी केली अटक…
सावंगी(मेघे) वर्धा –
सवीस्तर माहीती अशी की पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी आकाश बंडुजी धांदे वय 26 वर्, रा. सातोडा ता जि.वर्धा यांनी तोंडी रिपोर्ट दिला कि दि. 30/07/2023 ते 31/07/2023 चे दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे शेतातील विहीरिवरील पाण्याची मोटर, थ्रेशरची मोटर व त्याच शेत शिवारातील अनिल भानसे व रमेश माणीककुडे यांचे शेतातील विहीरीवरील पाण्याच्या मोटारी कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अप. क्र. 436/2023 कलम 379 भा.द.वी. अन्वये
सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. त्या अनुषंगाने
वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभागातील मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शेतशिवारातील शेती उपयोगी साहीत्य व पाण्याच्या मोटारी चोरी करण्याच्या घटना घडत होत्या त्यामुळे विभागातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक त्रास होत होता. त्या चोरीच्या घटनांची उकल करण्याबाबत पोलिस अधिक्षक वर्धा यांनी आदेशीत केल्याने पोलिस निरीक्षक
धनाजी जळक यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांना सदर गुन्ह्यातील आरोपी व मालाचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्यास निर्देशीत केले. त्यावरून गोपनिय बातमिदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे कसोशीने प्रयत्न करून गुन्ह्यातील आरोपी


1) आशीष नरेश घोंगडे वय 28 वर्ष रा. येळाकेळी

2) नारायण पूरूषोत्तम पाराशर वय 23 वर्ष रा. येळाकेळी

व एक विधी संघर्षीत बालक यांना गुन्ह्यासंबंधात सखोल विचारपूस करून गुन्ह्यातील चोरी गेलेला मालाबाबत विचारपूस केली असता
त्यांनी सदर माल, पूलगाव रोडवरील व आंजी खरांगणा परीसरातील विहीरीवरील मोटर चोरी केल्याचे सांगीतले त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरी करण्याकरीता वापरलेला आँटो की. 30,000 /- रू चा जप्त करून आरोपीतांनी चोरी केलेला माल भंगार विक्रेता
शोऐब खान रा. ईतवारा बाजार वर्धा
याला विकल्याचे सांगीतल्याने त्याचेपासुन गुन्ह्यात चोरी गेलेला माल विहीरीवरीव ईलेक्ट्रीक पाण्याच्या मोटर व नोजल की. 23,000/- रू असा जुमला की. 53,000/- रू. चा माल आरोपीतांजवळुन जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांनी पोलिस स्टेशन सावंगी, खरांगणा व देवळी हद्दीत पाण्याच्या विहीरीवरील मोटर व नोजल चोरी केल्याने हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन , अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधीकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनाजी जळक
यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी.पथकातील पो.हवा. सतीश दरवरे,पो.ना. अनिल वैद्य, भुषन निघोट, स्वप्नील मोरे, निलेश सडमाके, निखील फुटामे, अमोल जाधव यांनी केला. पुढील तपास पो.ना.अनिल वैद्य पोलिस स्टेशन सावंगी हे करीत आहे.


