सावंगी मेघे पोलिसांची अवैधरित्या पेट्रोल व डीझेलची विक्री व वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही….
सावंगी (मेघे) पोलिसांनी अवैध पेट्रोल-डिझेलची विक्री व वाहतूक करणारी टोळी केली गजाआड…..
सावंगी(मेघे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२१) रोजी संदीप कापडे ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) यांना मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीवरून त्यावरून ते पोलिस पथकासह तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले. असता यातील आरोपी शेख इश्ताक रा. विकास चौक, सेलू याचे राजकमल ढाबा अॅन्ड रेस्टॉरेंट मध्ये आरोपी
१) सैयद रिजवान सैयद महमूद अली, वय ३८ वर्ष, रा. खडकी( आमगाव)
२) अमजद खान आरीफ खान, वय ४१ वर्ष, रा. विकास चौक, सेलू
३) ज्ञानेश्वर हरीभाऊ चनकापुरे, वय ६० वर्ष, रा. सिरसगाव मोझरी जि. अमरावती
यांचे मदतीने पेट्रोल व डिझेल ची अवैधरित्या वाहतूक व विक्री कमी दराने पेट्रोल व डिझेल हे ज्वलनशील पदार्थ आहे असे माहिती असुन सुध्दा निष्काळजीपणाने अवैधरित्या टाटा झेनान पावर कंपनीची चारचाकी क्रमांक एमएच ०३ सीपी ४५८९ मध्ये ग्राहकांना विक्री करीता जवळ बाळगून तसेच विना परवाना देशी दारू बाळगून मिळून आल्याने आरोपीतांचे ताब्यातून
१) टाटा झेनान क्रमांक एमएच ०३ सीपी ४५८९ किं.३,५०,०००/-रू
२) ५० लिटर पेट्रोल किंमत ५३५०/- रू
३) ३० लिटर डिझेल २८२० /- रू
४) खाली डबक्या किंमत २०००/- रू
५) दोन मोबाईल किंमत १७०००/- रू
६) देशी दारू किंमत १५००/- रू
७) नगदी १८६७०/- रू असा एकूण अंदाजे किंमत ३,९७,३४०/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.तसेच नमुद आरोपी विरूध्द कलम 3,7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955,भादवि कलम २८६ ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपुर्वक हाताळणे,तसेच मुंबई दारुबंदी कायद्यान्वये पो.स्टे. सावंगी (मेघे) येथे गुन्हा नोंद करून तपास सुरु आहे
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सहा पोलिस निरीक्षक संदिप कापडे, ठाणेदार पो.स्टे. सावंगी (मेघे) यांचेसह चांद नबी, जावेद शेख, निलेश शडमाके, अनिल वैद्य, अमोल जाधव, निखील फुटाणे यांनी केली.