
सावंगी पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला उघड,मुद्देमालासह ३ आरोपींना केली अटक….
सावंगी(मेघे)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी दिनेश अखिलेश्वर शर्मा वय 61 वर्ष रा. गांधी चौक ग्रामचान ता.चानन जिल्हा बाका (बिहार) ह.मु. भगतसिंग चौक राधाकृपा बिल्डींग बाजने चौरे हाउस रामनगर वर्धा यांचे केशर प्लॉटमध्ये ठेवुन असलेले 1) लोखंडी केशर ब्लेड 2) रेज पाने 3) बिटर (लोहा तोडनेवाला) 4) स्प्रिंग पट्टा 5) लोखंडी प्लेट असा जु. किं 20,000/ रु चा माल दिनांक 17.12.2023 ते 18.12.2023 चे दरम्यान
कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेला अशा तोडी तक्रारीवरुन पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे अप क्र. 717 / 23 कलम 379 भादवी अन्वये गुन्हा नोंद केला होता
सदर गुन्हा दाखल होताच आरोपी व मुट्टेमालाचे शोधार्थ पोलिस पथक गेले असता, यातील नमुद आरोपी यांना भुगाव येथुन ताब्यात घेवुन गुन्हयासबंधाने विचारपुस केली असता, त्यानी गुन्हा केल्याचे
कबुल केल्याने व त्यांना नांव व पत्ता विचारला असता त्यांनी आपले नांव
1 ) गणेश सुर्यचंद्र पवार वय 19 वर्ष रा. पारधी बेडा भुगांव


2) कुणाल गजानन सराटे वय 20 वर्ष रा. वार्ड नं 03 भुगांव

3) आशिष अनंतराव थुल वय 25 वर्ष रा. वार्ड नं 03 भुगांव ता.जि. वर्धा

यांनी सदर गुन्हा केल्याने आरोपीजवळुन चोरीस गेलेला 1) लोखंडी केशर ब्लेड 2) रेज पाने 3) बिटर (लोहा तोडनेवाला) 4) स्प्रिंग पट्टा 5) लोखंडी
प्लेट असा एकुण जु. किं 20,000/ रु चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलिस अधीक्षक सांगर कवडे, साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदिप कापडे प्रभारी ठाणेदार, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अंमलदार पोहवा सतीश दरवरे, निलेश सडमाके, भुषण निघोट, नापोशि अनिल वैद्य, स्वप्नील मोरे, पोशि निखील फुटाणे, अमोल जाधव सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) यांनी केली


