SDPO यांचे पथकाची पुन्हा एकदा धडक कार्यवाही,१५ दिवसात ६० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..
पोलिस अधीक्षकांचे आदेशानुसार नववर्षाचे स्वागत हर्ष उल्हासात व्हावे व कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी मागील १५ दिवसात उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकानी उलेलखनिय कामगिरी करत १५ दिवसात किमान ६० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त केला…
वर्धा(प्रतिनिधी) – काल पोलिस अधिक्षकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन वर्षाच्या आगमनासाठी वर्धा पोलिस दल कसे सज्ज आहे हे सांगितले कुठलाही गैरप्रकार खपऊन घेतला जाणार नाही असा सज्जड दमच दिला त्यांच्या या आवाहनाला उपविभागीय पोलिस अधीकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांनी लगेच प्रतिसाद देत आपले अधिनस्त पथकास योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन दारुबंदी संबंधी कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्याअनुषंगाने त्यांचे पथकास दिनांक 30/12/2023 रोजी मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून पुलगाव वर्धा रेल्वे क्रॅासींग येथे नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहीतीवरुन एक ईसम आपले चारचाकी वाहनाने देशी विदेशी दारुसाठा आणनार असल्याचे समजताच मिळालेल्या वर्णनाची गाडी नाकाबंदी दरम्यान पोलिसांना दिसली तिची पाहनी केली असता त्यात
1) कोहीनुर संजय उके रा. आयुवेर्दीक सावंगी रूग्नालय जवळ, सालोड हिरापुर, वर्धा
2) दर्शन हरीभाऊ फुंडे रा. गणेश नगर, वर्धा
हे दोघेही पोलिसांना पाहताच वाहन थांबवुन पसार झाले वाहनाची तपासनी केली असता
1) एक चारचाकी वाहन क्र एम.एच. 06 ए.बी 3025 सिल्वर रंगाची होन्डासिटी कंपनीची किंमत अंदाजे 6,00,000/- रू
त्यात मध्ये रॅायल स्टॅग कंपनिच्या, ॲाफीसर चॅाईस ब्लु, ॲाफीसर चॅाईस,ओल्ड मंक,रॅायल चॅलेन्ज, टॅगो कपंनीच्या देशी दारूच्या वेगवेगळया कपंनीच्या देशी/विदेशी दारूच्या 12 पेटया किंमत 1,60,400 रू 2) एक टचपॅडवाला गोल्डंन रंगाचा मोबाईल त्या मध्ये जिओ कपंनीचे सिम की. 15,000/- रू असा एकुन 7,75,400 /- चा माल अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्त करण्यात आला
पोलिस स्टेशन सावंगी मेघे,वर्धा येथे पसार आरोपीविरूध्द अपराध क्रमांक /2023 कलम कलम 65 अ ई, 77 अ, 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सावंगी मेघे पोलिस करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरूल हसन अपर पोलिस अधिक्षक सागर कवडे याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद मकेश्वर पो.नि. ,स्था.गु.शा वर्धा याचे सुचनेप्रमाणे, पोउपनि परवेज खॅान, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोशि, मंगेष चावरे, पवन निलेकर, समीर शेख, तसेच स्था.गु.शा.वर्धा येथील पोउपनि. प्रकाश नागापुरे पो.हवा गजानन लामसे,, रितेश शर्मा, गोपाल बावनकर, मंगेष आदे तसेच सायबर सेल वर्धा चे दिनेश बोथकर यांनी यशस्वी रित्या पार पाडली