
SDPO वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडला विदेशी दारुचा साठा…
वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथकाने पोद्दार बगीचा, रामनगर येथे नाकेबंदी करून चारचाकी वाहनासह विदेशी दारू असा एकुन 6,95,200 /- रू चा माल केला जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१०)रोजी वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथक रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती प्राप्त झाली की यांनी एक टाटा ईंडीका वाहन अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक करीत आहे व पोद्दार बगीचा कडे येणार आहे अशा गोपनिय माहीती वरून पोददार बगीचा,
रामनगर वर्धा येथे नाकेबंदी करून सदर वाहनास थांबवुन त्यातील ईसमांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) शंकर किशनचंद दानानी वय 45 वर्ष रा. वार्ड न. 34 पोद्दार बगीचा वर्धा हा मिळुन आला त्याचे ताब्यातुन 1) एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन टाटा कंपनीची इंडीका विस्टा क्र एम. एच 40 ए.सी. 6153 अंदाजे किंमत 6,00,000/- रू व त्यामधून 2 ) 2 लिटर च्या विदेशी दारूने भरून असलेल्या इम्प्रेरियल ब्लु कंपनिच्या 2 प्लॉस्टीक बंपर 3)1 लिटर च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस कंपनिच्या 6 प्लॉस्टीक बंफर 4) दोन खरडर्याचे खोक्या मध्ये 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या कॉसबर्ग कंपनिच्या 48 टिन 5) एका खरडर्याचे खोक्या मध्ये 500 एम.एल. च्या बियर दारूने भरून असलेल्या बडवाईझर कंपनिच्या 24 टिन कॅन 6) 375 एम. एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस ब्लु कंपनिच्या 18 शिश्या 7 ) 375 एम. एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्टॅग कंपनिच्या 18 शिश्या 8 ) 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस कंपनिच्या 18 शिश्या 9 ) 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्टॅग कंपनिच्या 24 शिश्या 10 ) 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून
असलेल्या रॉयल चॉलेन्जर कंपनिच्या 24 शिश्या 11 ) एक पांढऱ्या रंगाचा ओप्पो कपंनीचा मोबाईल मध्ये जिओ कपंनीचे सिम क्र 9022120564 कि 10000/- रू चा असा एकुण जु. किंमत 6,95,200 /- रू. चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्त करण्यात आल्या


सदर आरोपीस विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता सदर विदेशी दारूचा माल हा नागपुर येथे
मेयो हॉस्पीटल जवळ जावुन तेथे माझे जवळ असलेल्या मोबाईलने सुनिल बेद रा. नागपुर यास त्याचे मोबाईलवर फोन करून सुनील बैद यास विदेशी दारू व बियर साठी पैसे दिले व त्यांनी माझी गाडी व पैसे घेवुन जावुन काही वेळातच विदेशी दारूचा माल आणुन दिला असे सांगीतल्याने सदर आरोपी सुनील बैद रा. नागपुर यास आरोपी बनविण्यात आले आहे.

यावरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे आरोपी विरूध्द अपराध क्रमांक 443/ 2024 कलम 65 अ ई. 77 अ, 83, म.दा.का.
सहकलम 3 (1)181,130/177 मो.वा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगर करीत आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. नूरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद के. मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी,कार्यालयातील पथकातील पोउपनि. परवेज खान, पो. हवा. अमर लाखे, पोशि मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख यांनी यशस्वी रित्या पार पाडली.


