
सेलु पोलिसांची दारुबंदी विरोधात दबंग कार्यवाही
सेलु(वर्धा)- दिनांक 05/09/2023 रोजी मौजा जामणी पारधी बेडा येथे काही ईसम व महीला हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असून तसेच गावठी मोहा दारुच्या हातभट्टी करिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी श्रीमती सोनु संजित भोसले ही हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आली तसेच गुड्डु बंडु पवार, अब्बास श्यामलाल पवार, व जयशिला प्रविण पवार हे गावठी मोहा दारु करिता कच्चा मोहा रसायन सडवा तयार करतांना मिळून आल्याने सदर आरोपीतांचे ताब्यातून मोक्यावर 21 लहान मोठ्या ड्रम मध्ये कच्चा व उकळता मोहा रसायन सडवा 3200 लीटर, गावठी मोहा दारु 40 लीटर व गावठी मोहा दारु हातभट्टी साठी लागणारे ईतर साहीत्य असा एकूण जु.कि. 3,58,100/- रु. चा माल मिळून आल्याने मौक्यावर नाश करण्यात आला असून आरोपी
१) श्रीमती सोनु संजित भोसले,


2) गुड्डु बंडु पवार,

3) अब्बास श्यामलाल पवार,

4) जयशिला प्रविण पवार
सर्व रा. जामणी पारधी बेडा, ता. सेलू, जि.वर्धा
यांचे विरुध्द पोलिस स्टेशन सेलू येथे कलम 65 बी,सि.एफ. व 65 एफ मदाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू पोलीस अंमलदार गणेश राऊत, रविंद्र रघाटाटे, शरद इंगोले, तुषार भुते, अखिलेश गव्हाणे, अमर लाखे, विक्रम काळमेघ, मंगेश राऊत, ज्ञानदेव वनवे, दिनेश चव्हाण, कृष्णा माने, अनिकेत कोल्हे, महिला अमंलदार शेख रुकसाना यांनी केली.


