
सेवाग्राम पोलिसांनी पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…
नाकाबंदी दरम्यान सेवाग्राम पोलिसांनी पकडला अवैध दारूसाठा, ३,२९०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त…
सेवाग्राम( वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम हद्दीत वर्धा नागपूर रोडवर महसूल कॉलनी दत्तपूर येथे सेवाग्राम पोलिसांनी नाकाबंदी करून मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार छापा टाकला असता टाटा Tiago क्रमांक MH 32 AS2113 या कारची तपासनी केली असता कारसह 3 लाख 29 हजार रुपयांचा मद्यसाठा सापडला.
याप्रकरणी कार चालक मेजवानी हॉटेलचा मालक1


) धीरज प्रभाकर खंगार रा. हिंद नगर वर्धा

2)आकाश उर्फ चकन अजय मोटघरे रा. रामनगर वर्धा

यांना अटक करण्यात आली असून त्यांचे सांगितले प्रमाणे सदरचा दारुसाठा हा लिओ पोर्ट बार अँड रेस्टॉरंट येथुन आणला असुन लिओ बारचा मालक
३) नयन चिंतलवार रा नागपूर (फरार) असे असे तिसर्या आरोपीचे नाव असून आरोपी 1 व आरोपी 2 यांचे ताब्यातुन चारचाकी वाहन टाटा टियागो कंपनीचे व त्यात
1) विदेशी दारुनी भरलेल्या ऑफिसर चाँईस ब्लू कंपनीच्या 22 बॉटल
2) विदेशी दारू नी भरलेल्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या 20 बाँटल 3) विदेशी दारू नी भरलेल्या रॉयल चॅलेंजर कंपनीच्या 19 बाँटल
4) विदेशी दारू ने भरलेल्या रॉयल टॅग कंपनीच्या 46 बाँटल
असा एकूण कारसह किंमत 3,29,000/- रुपये
चा मुद्देमाल आढळुन आला , पोलिसांनी कारसह दारूसाठा जप्त करीत चालकास बेड्या घातल्या .
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ सागर कवडे उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा उपविभाग, प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन सेवाग्रामचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या निर्देशात पोलिस अंमलदार हरिदास काकड अभय इंगळे पवन झाडे यांनी केली .


