
विनापरवाना रेती(वाळुची)वाहतुक करणारे सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…
रेती(वाळुची) अवैधरित्या वाहतुक करुन विक्री करणारे वाहन सिॅदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात….
सिंदी रेल्वे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 20/02/2024 चे 01:45 वा. ते 02:15 वा. दरम्यान पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे पोलिसांचे पथक रात्र गस्तीवर असतांना वार्ड क्र. 11, सिंदी रेल्वे येथे पोलिस हवालदार चंद्रकांत भावरे यांना रात्रगस्ती दरम्यान टिप्पर क्रमांक MH 32 Q 5574 येताना दिसले वरील चालकास वाहन थांबविण्यास सांगितले असता तो संशयास्पद रीतीने पळून जाऊ लागला त्यावेळी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने रेती(वाळु) हे गौण खनिज चोरून आणुन आणून वार्ड 11 सिंदी येथील मुळक यांच्या घरासमोर टाकल्याचे सांगितल्याने त्यास सदर रेती(वाळु) बाबत पास परवाना विचारले असता त्याच्याकडे रेती वाहतुकीचा पासपरवाना नसल्याने त्याने रेती वाळु टाकलेल्या ठिकाणी पंचा सह जाऊन पंचनामा कारवाई करून
1) एका पिवळ्या रंगाचा टिप्पर क्र. MH32Q5574 अंदाजे किं. 8,00,000/- रु


2) अंदाजे 2.5 ब्रास काळी रेती किंमत 12,500/- रु अशी एकूण किंमत 8,12,500/- वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करून

1) टिप्पर चालक सुशील भैय्याजी बांगरे, वय 35 वर्ष,रा. कांढळी, ता. समुद्रपूर, जि . वर्धा.
2) टिप्पर क्लीनर – सुरज गिरीराज बैस, वय 26 वर्ष, रा. उमरा, ता. समुद्रपूर, जि. वर्धा,
3) मालक – अमोल मनोहर भिसे, वय 33 वर्ष, रा. उमरा, ता. समुद्रपूर, जि. वर्धा

या नमूद आरोपीतांविरुद्ध पोलिस स्टेशन,सिंदी रेल्वे येथे अप. क्र.73/2024, कलम 379, 34 IPC प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन,पुढील तपास नापोशि. सुरत सयाम हे करीत आहेत
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतन कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे सहा.पोलिस निरीक्षक वंदना सोनुने,पो.हवा. चंद्रकांत भावरे, संजय भगत,नापोशि सुरज सयाम,पोशि उमेश खामनकर


