
पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांनी अवैध धंद्याविरोधात आखलेल्या रणनितीने अवैध धंदे करणारे झाले सैरभैर,दररोज कार्यवाहीचा बडगा सुरुच राहणार…
देवळी(वर्धा) – दि. ३१/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे एन. डी. पि. एस. पथक देवळी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्यधंद्यावर कारवाई करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीतीचे आधारे आरोपी नामे
किरण रविंद्र कामडी, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. २ वायगांव (निपाणी)


यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता आरोपीचे ताब्यातील कार मध्ये देशी विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा मिळुन आला. पोलिसांनी आरोपीचे ताब्यातुन देशी विदेशी दारू किंमत २,२०,२००/- रू व एक स्वीफ्ट कार असा एकुण ५,७०,२००/- रू माल जप्त करण्यात आला. सदर देशी विदेशी दारू माल आरोपी याने कळंब, जि. यवतमाळ येथील मुकेश जयस्वाल यांचे कडुन
आणल्याचे सांगीतल्याने आरोपी

१) किरण रविंद्र कामडी, २) मुकेश जयस्वाल, रा. कळंब, जि.
यवतमाळ यांचे विरूध्द पो.स्टे. देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, पोहवा हमिद शेख, श्रीकांत खडसे, प्रदिप वाघ, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तसेच अंकित जिभे, सायबर सेल, वर्धा यांनी केली असुन गुन्हयाचा तपास पो.स्टे. देवळी येथील अधिकारी करीत आहे.
तसेच दुसर्या एका कार्यवाहीत
तळेगाव (शा पंत ) वर्धा – दिनांक ३१/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक उपविभाग आर्वी परिसरात अवैद्यधंद्यावर कारवाई करण्या करीता पो.स्टे. तळेगांव (शा.पंत) हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीचे आधारे
१) नामदेव गजानन गाखरे, वय ४८ वर्ष, रा. सावळी (बु) ता. कारंजा घा.
२)रामदास भरतराम घागरे, वय ५२ वर्ष, रा. शेलगांव (उमाटे) ता. कारंजा घा. यांचेवर एन.डी.पि.एस अॅक्ट अन्वये तळेगांव (शा. पंत) आष्टी टी पॉईंट येथे सापळा रचुन रेड केला असता नमुद आरोपी हे संगणमताने ‘गांजा’ अंमली पदार्थ विक्री करीता घेवुन जातांना मिळुन आले. आरोपीतांचे ताब्यातुन
१) ९१२ ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ किं. १८, २४० / – रू
२) एक मोबाईल फोन किं. १,००० / – रू
३) एक मोटर सायकल किं. ६०,००० / – रू
४) गांजा विक्रीचे नगदी ११,३०० / – रू असा एकुण ९०, ५४० / – रू मुद्देमाल एन. डी. पि. एस कायद्यान्वये जप्त करण्यात आला. आरोपी १) नामदेव गजानन गाखरे, वय ४८ वर्ष, रा. सावळी (बु) ता. कारंजा घा.
२) रामदास भरतराम घागरे, वय ५२ वर्ष, रा. शेलगांव ( उमाटे) ता. कारंजा घा. यांचे विरूध्द दि. ०१/११/२०२३ रोजी पहाटे पो.स्टे. तळेगांव (शा.पंत) येथे गुन्हा नोंद करण्यात आला. आज रोजी यातील मुख्य सुत्रधार
सुजित सोनी रा. कारंजा घाडगे ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे घर झडतीमध्ये ‘गांजा’ अंमली पदार्थ मिळुन आल्याने जप्ती व अटकेची कारवाई सुरू होती. सदर आरोपी हा यातील मुख्यसुत्रधार असुन तो अटक करण्यात आलेल्या आरोपीकडुन गांजा तस्करीचे रॅकेट चालवित असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी विरूध्द पो.स्टे. तळेगांव(शा.पंत) येथे अप. क्र. ५८४ / २०२३ कलम ८(क), २०(ब)ii(अ), २९ एन.डी.पि.एस. अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही उपविभागिय पोलिस अधिकारी आर्वी, खंडेराव साहेब यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक, संदिप धोबे, ठाणेदार पो.स्टे. तळेगांव (शा.पंत), पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, स.फौ. मनोज धात्रक, पोहवा हमिद शेख, श्रीकांत खडसे, संजय बोगा, प्रदिप वाघ, विनोद कापसे, अभिलाष नाईक, चालक अखिल इंगळे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तसेच दिनेश बोथकर, विशाल मडावी, सायबर सेल, वर्धा यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. तळेगांव (शा. पंत) करीत आहे.
सदरच्या दोन्ही कामगिर्या पोलिस अधिक्षक, नूरूल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे, यांचे आदेशानुसार करण्यात आल्या
.


