
कत्तलीसाठी अवैध गौवंशीय वाहतुक करणारे तळेगाव पोलिसांचे ताब्यात,४ जनावरांची केली सुटका…
कत्तलीसाठी अवैध गौवंशीय वाहतुक करणारे तळेगाव पोलिसांचे ताब्यात…..
तळेगाव(शा.पंत)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक १७ रोजी मुखबिरकडुन खबर मिळाली की, दोन ईसम
हे मालवाहु बोलेरो वाहनाने गोवंशाची अवैध वाहतुक करित आहे अशा गोपनिय माहीतीवरुन नाकाबंदी केली असता वाहन चालक याने आम्ही वाहन थांबवण्याचा इशारा केला असता वाहन न थांबवता अमरावतीकडे भरधाव वेगाने घेऊन गेल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास थांबवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव


१) निलेश सुरेश घाटोळे वय २८ वर्ष , तसेच क्लिनर

२ ) निखिल हेमराज खवसे वय २६ वर्ष,

३) प्रविण उर्फ लहानु चरणदास रंगारी सर्व रा. मुर्ती, ता. काटोल, जि. नागपुर यांनील गोवंशीय जनावरे बैल मालक
दर वाहनाची तपासनी केली असता वाहनाच्या डाल्यात एकून ४ पांढऱ्या रंगाचे गोवंशीय बैल यांना कोणत्याही प्रकारचा चारा, पाणी न देता त्यांना वाहनात उभे राहता येत नाही व बसता येत नाही अशा स्थितित क्रुर वागणुक देऊन वाहतुक करताना मिळुन आले. त्यावरून सदर वाहनाचे चालकास सदर गोवंशीय जनावारांचे वाहतुकीचा पासपरवाना विचारला असता त्याचे जवळ नसल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे सदरचे गोवंशीय जनावर ४ पांढरे बैलाबाबत विचारणा केली असता सदरचे बैल हे चरण महादेवराव सोनटक्के रा. भारसवाडी, जि. अमरावती यांचे मालकीचे असुन त्यांचे सांगणे वरून त्यांनी सदरचे बैल काटोल येथुन वाहनामध्ये टाकुन अमरावतीकडे नेत असल्याचे सांगितले. तेव्हा सदरचे गोवंशीय जनावरांना अतिशय निर्दयतेने वागणुक देवुन वाहनात क्रूरपणे डांबुन त्यांची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर वाहन चालक याचे ताब्यातुन
1) पांढऱ्या रंगाचे ४ गोवंशीय जनावर बैल प्रति किं. 10,000 रू असा एकुण 40,000 रू. व
2) एक जुनी वापरती मालवाहु बोलेरो गाडी क्र. क्र. एम. एच. – 31 / ई.एन. – 0812 किं. 4,00,000 रू असा एकुण 4,40,000 रू चा माल जप्त करण्यात आला.तेव्हा यातील मालवाहु बोलेरो गाडी क्र. क्र. एम.एच. – 31/ई.एन.-0812 चालक
आरोपी नामे
1) निलेश सुरेश घाटोळे वय २८ वर्ष , तसेच क्लिनर
2 ) निखिल हेमराज खवसे वय 26 वर्ष,
3) प्रविण उर्फ लहानु चरणदास रंगारी सर्व रा. मुर्ती, ता. काटोल, जि. नागपुर यांनील गोवंशीय जनावरे बैल मालक
4) चरण महादेवराव वय ३२वर्ष, सोनटक्के रा. भारसवाडी, अमरावती याचे सांगणे
वरून अमरावती येथे नेत असल्याचे सांगितले यावरुन
वरील आरोपीविरुध्द क 34,109 भादंवि सह क. 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, सह कलम 11 (1) (डी) (ई) (एफ) भा.प्रा.छ. प्रति 1960 प्रमाणे गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास
पोलिस स्टेशन तळेगांव करित आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,आर्वी देवराव खंडेराव यांचे आदेशाने संदीप ढोबे ठाणेदार तळेगाव शामजी पंत पोलिस हवा निखिल काळे,नापोशि अतुल अडसड,पोशि अनिल ढाकणे


