वाशिम स्थागुशा पथकाने अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करुन मोटारसायकल चोरीचे १० गुन्हे उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मोटारसायकल चोरट्यास जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश,विविध गुन्ह्यातील १० मोटारसायकल जप्त..,.
वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पो.स्टे.वाशिम शहर येथे दाखल अप.क्र.९३२/२२, कलम ३७९ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करत असतांना गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे ग्राम  शिवणी भेंडेकर, ता. मंगरूळपीर, जि.वाशिम येथील ३२ वर्षीय ईसमास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून पो.स्टे. वाशिम शहर व विविध जिल्ह्यातील एकूण १० मोटार-सायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश प्राप्त झाले आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी नामे संतोष अशोकराव भेंडेकर, वय ३२ वर्षे, रा. शिवणी भेंडेकर, ता.मंगरूळपीर, जि.वाशिम हा निष्पन्न झाल्याने त्याला ग्राम शिवणी भेंडेकर येथून ताब्यात घेऊन त्याच्याजवळून पो.स्टे. वाशिम शहर व विविध जिल्ह्यातील चोरीच्या एकूण १० मोटारसायकल किं.६.५० लाख रुपये हस्तगत करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अश्या प्रकारचे चोरीच्या मोटारसायकल विनाकागदपत्रांच्या विक्री करतांना आढळून आल्यास किंवा चोरीबाबत माहिती असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.
सदर कामगिरी पोलिस अधीक्षक अनुज तारे  , अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली  रामकृष्ण महल्ले, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि.रमाकांत खंदारे, पोउपनि. शब्बीर पठाण, पोलिस अंमलदार दिपक सोनवणे, प्रशांत राजगुरू, अमोल इंगोले, प्रवीण राऊत, विठ्ठल महाले, विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा,वाशिम यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!