महावितरण चे ॲल्युमिनियम विजेच्या तारा चोरणारी टोळी स्थागुशा पथकाचे ताब्यात…
ॲल्युमिनीअमच्या विद्युत तारांची चोरी करणारी टोळी स्थागुशा पथकाचे ताब्यात,५ आरोपींसह एकूण ९,२८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त…..
वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मंगरूळपीर, जि. वाशिम येथे दि. १६/०१/२०२४ रोजी फिर्यादी सुरज साहेबराव कोंगे, वय ३२ वर्षे,नोकरी (कनिष्ठ अभियंता महावितरण, मंगरूळपीर), रा. बाबरे लेआउट, शहापूर, मंगरूळपीर, जि. वाशिम यांनी तक्रार दिली की, १३२ केव्ही सबस्टेशन, मंगरूळपीर, पासून ते अंबापूर फाटयापर्यंत अॅल्युमिनीअमच्या अंदाजे ८४०० मीटर विद्युत तारा अंदाजे किंमत ५,००,०००/- रू. कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या आहेत. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिस स्टेशन मंगरूळपीर येथे अप.क्र. २३/२०२४, कलम ३७९ भादवि अन्वये दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, सदर विद्युत तारांची चोरी ही आरोपी नामे
१) शेख अंसार शेख शेख चाँद उर्फ बब्बू, वय ३६ वर्षे,
धंदा – मजुरी, रा. अमडापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा
२) शेख शहजाद शेख कदीर, वय २३ वर्षे, धंदा-चालक, रा. समी प्लॉट, पातूर, जि. अकोला
३) शेख अकबर शेख अबू कलाम, वय ३५ वर्षे, धंदा-मजुरी, रा. काळेगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा
४) शेख मोहसीन शेख करीम, वय ३६ वर्षे, धंदा-मजुरी, रा.
मोमीनपुरा, पातूर, जि. अकोला व
५)शेख शोएब शेख खलील, वय २१ वर्षे, धंदा – मजुरी, रा. मोमीनपुरा, पातूर, जि. अकोला
यांनी केली आहे. त्यानंतर नमूद आरोपींनी बुलढाणा व अकोला जिल्हयातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली व चोरीस गेलेल्या विद्युत तारा या पातूर येथील एका नाल्याच्या खाली लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद ठिकाणी जाऊन एकूण ४५६ किलो ॲल्युमिनीअमच्या विद्युत तारा, किंमत अंदाजे २,२८,०००/- रू. व आरोपींनी चोरीकरताना वापरलेले वाहन बोलेरो पीकअप गाडी क्र. एम. एच. ४८ जी. १२७१, किंमत अंदाजे ७,००,०००/- रू. असा एकूण ९,२८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त
करण्यात आला असून आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई करनेकामी पोलिस स्टेशन मंगरूळपीर, जि. वाशिम यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलिस
अधिक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि रमाकांत खंदारे, पोलीस अंमलदार पोहवा राजेश राठोड, आशिष बिडवे, नापोशि राम नागूलकर, ज्ञानदेव मात्रे व पोशि विठ्ठल महाले यांनी पार पाडली.