संशईत रेकॅार्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दिवसा व रात्रीच्या घरफोडी करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन  स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे. एकुण ३.५० लाख रू च्या माल जप्त….

वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दाट वस्ती मध्ये भर दिवसा व रात्री घरफोडया करणा-या आरोपींचा शोध घेवुन पोलिस स्टेशन. वाशिम शहर येथे दाखल अप.क्र. २३२ / २०२४, पोस्टे मालेगांव अप.क्र. १७४ / २४ पोस्टे अनसिंग अप क ११७/२४ कलम ४५७,३८० भादंवि कलम ४५४,३८० भादंवि च्या गुन्हयातील आरोपी  धनंजय दिलीपराव पवार वय ३२ वर्ष २ ) अंकुश राजेश कुलकर्णी वय २२ वर्ष ३) मुकेश ओमप्रकाश शर्मा वय ३१ वर्ष यांना निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी  चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने.





स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ०२ आरोपी अकोला जिल्ह्यातून  तर ०१ आरोपी विक्रोळी मुंबई हददीतुन  ताब्यात घेवुन त्याच्या कडुन ३.५० लाख रूपये रक्कमेचे सोन्याचा धातुचा तुकडा ताब्यात घेतला त्यावरून पोलिस स्टेशन वाशिम शहर येथील एक गुन्हा,पोलीस स्टेशन मालेगांव तसेच पोलीस स्टेशन अनसिंग येथील एक गुन्हा उघड झाला असुन सदर गुन्हयात ३.५० लाख रूपयाचा मुददेमाल जप्त केला असुन सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलिस स्टेशन वाशिम शहर मालेगांव व अनसिंग यांचे ताब्यात दिले आहे. नागरीकांनी अशा प्रकारचा गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहीती तात्काळ पोलिस प्रशासनास द्यावी असे आवाहान वाशिम जिल्हा पोलिस दला तर्फे करण्यात येत आहे.



सदरची कामगिरी  पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक  भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सपोनि योगेश धोत्रे पोहवा प्रशांत राजगुरू,नापोशि ज्ञानदेव म्हात्रे, पोशि निलेश इंगळे, अविनाश वाढे, विठठल महल्ले, दिपक घुगे व चालक गजानन जाधव यांचे पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!