शेतमाल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणाऱ्या ५ चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन ८.९ लाखांचा मुद्देमाल केला जप्त….
वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मालेगाव, जि.वाशिम येथे दि.२७.०४.२०२४ रोजी फिर्यादी अरुणराव शंकरराव घुगे, वय ५२ वर्षे, धंदा – शेती, रा.मारसूळ, ता.मालेगाव, जि.वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.(२७) च्या रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या गोडाऊन मधून ०६ क्विंटल सोयाबीन चोरी केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पो.स्टे.मालेगाव येथे अप.क्र.१९५/२०२४, कलम ४६१, ३८० भांदवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी नामे १) शुभम मधुकर खंडारे, वय २६ वर्षे, २) आकाश वसंत खंडारे, वय २७ वर्षे, ३) सोनू प्रभू लठाड, वय २७ वर्षे, ४) श्याम शिलपत पवार, वय २४ वर्षे सर्व रा.चिखली, ता.मंगरूळपीर, जि.वाशिम व ५) स्वप्नील देवानंद जाधव, वय २० वर्षे रा.रामराववाडी, ता.मंगरूळपीर, जि.वाशिम यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून एकूण २७ क्विंटल सोयाबीन किं.१,१८,८००/-रु., १६ क्विंटल हरभरा अं.किं.७३,६००/-रु., १८ क्विंटल तूर अं.किं.१,९८,०००/-रु. व गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा एस. गाडी क्र. MH 30 BD 5054 असा एकूण ०८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर नमूद आरोपीकडून पो.स्टे.मालेगाव येथे दाखल व हद्दीतील ०३ शेतमाल चोरीचे गुन्हे, पो.स्टे.शिरपूर येथे दाखल व हद्दीतील ०२ शेतमाल चोरीचे गुन्हे, पो.स्टे.रिसोड येथे दाखल व हद्दीतील ०२ शेतमाल चोरीचे गुन्हे व पो.स्टे.मंगरूळपीर येथे दाखल व हद्दीतील ०३ शेतमाल चोरीचे गुन्हे असे एकूण १० विविध कलमान्वये दाखल शेतमाल चोरीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश प्राप्त झाले आहे. सदर गुन्ह्यांतील ०५ आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पो.स्टे.मालेगाव, जि.वाशिम यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक.रामकृष्ण महल्ले यांच्या नैतृत्वाखाली सपोनि.रमाकांत खंदारे, सपोनि.योगेश धोत्रे, पोलिस अंमलदार प्रशांत राजगुरू, राजेश राठोड, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, दिपक घुगे, विठ्ठल महाले व संदिप डाखोरे यांनी पार पाडली.