नांदेड येथुन चोरीस गेलेल्या दुचाकी वाशीम गुन्हे शाखेने केल्या हस्तगत…
नांदेड जिल्हयातून चोरी गेलेल्या एकून ५ मोटार सायकल स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत करून नांदेड पोलिसांचे ताब्यात दिल्या…..
वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२१)ॲागस्ट २०२४ रोजी राजाकिन्ही शेलूबाजार परीसरात चोरीच्या मोटारसायकल असल्या बाबत मिळालेल्या गोपनिय माहीती वरून स्था. गू.शा वाशिम येथील टिम सपोनि योगेश धोत्रे पोहवा गजानन झगरे, गजानन अवगळे, दिपक सोनवने,नापोशि प्रवीण राउत, मात्रे असे शेलूबाजार राजाकिन्ही परीसरात रवाना होऊन मिळालेल्या माहीती प्रमाणे चोरीच्या मोटारसायकल चा शोध घेतला असता पाच मोटारसायकल मिळुन आल्या ज्याची एकुन किंमत ३८००००/- रू आहे
सदर मोटारसायकल बाबत उप प्रादेशिक परीवहन विभाग वाशिम यांचेकडून माहीती घेतली असता वर नमूद मोटारसायकल ह्या नदिड जिल्हयातील असल्याबाचतची माहीती प्राप्त झाली. नांदेड जिल्हयातून सदर मोटारसायकल बाबत माहीती घेतली असता नांदेड जिल्हयातील १) लिम्बगांव पो.स्टे. येथील अपराध क्रमांक ६८/२३ कलम ३७९ भा.द.वी मधील हिरो स्पलेन्डर प्लस कंपनीची मोटारसायकल २). पो.स्टे. बारड येथील अप नंबर ४४/२३ कलम ३७९ भा.द.वी मधील होन्डाशाईन कंपनीची मोटारसायकल हया बाबत गुन्हे दाखल असून ईतर तीन मोटारसायकल सूध्दा चोरी गेल्या बाबत माहीती मिळाली आहे
सदर मोटारसायकल बाबत गोपनिय माहीती घेतली असता विकास ग्यानबा घाडगे रा. कामठा याने सदर मोटारसायकल नदिड जिल्हा परीसरातून चोरल्या व शेलूबाजार राजाकिन्ही जि. वाशिम परीसरात आणून दिल्या असे समजले वरून पोलिस स्टॉपसह नांदेड जिल्हयातील कामठा बू. अर्धापूर परीसरात आरोपी विकास घाडगे हयाचा त्यचे रहाते घरी व परीसरात शोध घेतला असता तो. मिळून न आल्याने स्था.गु.शा नांदेड व पो.स्टे. अर्धापूर जि. नंदिड पोलीसांशी संपर्क करून त्यांना आरोपी विकास घाडगे बाबत संपूर्ण फौटो सह माहीती देवून त्याचे जवळ ईतर चोरीच्या मो.सा असल्याबाबत माहीती दिली सदरच्या मोटारसायकल ह्या नांदेड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्या.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुज तारे,अपर पोलिस अधिक्षक. भारत तांगडे यांचे मार्गदर्शना मध्ये पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रामकृष्ण महल्ले सपोनि योगेश धोत्रे पोहवा गजानन झगरे,गजानन अवगळे,दिपक सोनवने नापोशि प्रवीन राउत ज्ञानदेव मात्रे यांनी पार पाडली आहे.