पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा जुगार अड्डयावर छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा कारंजा लाड़ येथील जुगार अड्डयावर छापा,१० जुगाऱ्यांवर कारवाई ६८ हजारांचा मुद्देमाल केला जप्त….

वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अनुज तारे  यांनी सर्व प्रभारींना दिलेले आहेत.





त्या अनुषंगाने दि.०५.०४.२०२३ रोजी पोलिस अधीक्षक अनुज तारे  यांना गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे त्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली कारंजा शहरातील एका बंद पडक्या घरात महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला वरली मटका जुगार खेळत असतांना सदर ठिकाणी धाड टाकून ६८,५६०/- रु मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कारंजा शहरातील गांधी चौकातील मारवाडीपुरा येथील एका बंद पडक्या घरात पैश्यांवर हारजीतचा जुगार खेळविला जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून सदर ठिकाणी पंचासमक्ष जाऊन जुगार रेड कारवाई केली. सदर कारवाईमध्ये ०८ आरोपी ताब्यात घेउन त्यांच्याकडून वरली मटका साहित्य व चिठ्ठ्या, नगदी ४२,५१०/- रु, ०६ मोबाईल संच व एक कुलर असा एकूण ६८,५६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व सदर गुन्ह्यात ०२ आरोपी फरार आहेत. सदर आरोपींवर पो.स्टे.कारंजा शहर येथे कलम ४, ५ मजुका अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.



सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे,अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोनि.प्रवीण धुमाळ, पोउपनि.रविकांत देशमुख, पोहवा.दिनेश काकडे, पोशि.समाधान इंगोले, दादाराव भोयर यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.



 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!