सराईत मोटारसायकल चोरट्यांना मंगरुळपीर पोलिसांनी केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मोटारसायकल चोरी करणारी टोळी  पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ताब्यात 6,22,000/- रु चा मुद्देमाल हस्तगत केला….

मंगरुळपीर(वाशिम)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मंगरुळपीर हददीत मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसावा याकरीता उपविभागिय पोलिस अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक यांनी सुचना निर्गमीत करून अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मार्गदर्शन केले होते. अशा घटनेच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथे दिनांक 28/12/2023 रोजी अप क्र 918/2023 कलम 379 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा दिगांबर राठोड करीत आहे.
पोलिस स्टेशन  मंगरुळपीर येथून वरील नमुद गुन्हयात चोरी गेलेली मोटारसायकल तसेच यापूर्वी पोलिस स्टेशन हद्दीमधून चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा समांतर तपास करून शोध घेत असतांना व घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून आरोपीची शरीरयष्टी व गुन्ह्य करण्याची पध्दती अभ्यासून सदर आरोपीबाबत गुन्हे प्रकटीकरण  पथक येथील पोहवा  अमोल मुंढे, पोशि मोहमंद परसुवाले यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, सीसीटीव्ही मधील शरीरयष्टी असेलला इस ग्राम लावणा येथील रमजान निजाम परसुवाले हा असून त्यानेच सदर मोटारसायकल ही
चोरी केली आहे. अशा माहीतीवरून पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक यांना ग्राम लावणा येथे रवाना केले आणि सदर इसम याची गोपनीय माहीती काढून त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता वरील अपराध क्र 918/23 मधील मोटारसायकल त्यांनी त्याचे साथीदार सतिश नारायण चौधरी लावणा आणि विशाल अरविंद चव्हाण रा जोगलदरी यांचेसोबत मिळून केल्याचे रांगून सदर मोटारसायकल  त्याचे घरीच ठेवल्याचे सांगितल्याने त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घराच्या आवारात दोन मोटार सायकली गिळून आल्या आरोपी याने सदर
दोन मोटारसायकल  पैकी एक मोटारसायकल  वरील गुन्हयातील असल्याचे सांगितले आणि दुसरी मोटारसायकल ही सुध्दा चोरी करून आणल्याचे सांगितले. तसेच त्याचे वरील दोन साथीदार यांचेकडे सुध्दा चोरी मोटारसायकल  असल्याचे सांगितले व आरोपी रंगजान परसुवाले याचे भाथीदार सतिष नारायण चौधरी आणि विशाल अरविंद चव्हाण यांना सुध्दा ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी पोलिस स्टेशन अप क्र 918/23 मधील मोटारसायकल  चोरी केल्याचे सांगितले परंतु पोलिस स्टेशन हद्दीत उर्वरीत चोरी गेलेल्या वाहणाबाबत विचारपूस केली असता प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना पुन्हा विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी पोस्टे हद्दीतील तसेच इतर पोस्टे हद्दीमधून चोरी केलेल्या मोटारसायकल  लपवून ठेवल्याबाबत सांगितल्याने आरोपी सतिश नारायण चौधरी वय 40 वर्ष रा लावणा ता मंगरुळपीर यांचे कडून पाच मोटार सायकली तसेच आरोपी विशाल अरविंद चव्हाण याचेकडून चार मोटार
सायकली अशा एकूण 11 मोटार सायकल एकूण किंमत 6,22,000/ रुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी





1) रमजान निजाम परसुवाले वय 25 वर्ष रा लावणा ता. मंगरूळपीर जि. वाशिम
2) विशाल अरवींद चव्हान वय 28 वर्ष रा. जोगलदरी ता. मंगरुळपीर जि. वाशिम
3) सतीष नारायण चौधरी वय 40 वर्ष रा. लावणा ता. मंगरुळपीर जि. वाशिम



यांना  पोस्टे हद्दीतील तसेच इतर पोलिस स्टेशन हद्दीत अनेक मोटार सायकली चोरी केल्या असून त्याबाबत अधिक विचारपूस सुरु आहे.
सदरची कार्यवाही  अनुज तारे पोलिस अधीक्षक,भारत तांगडे
अप्पर पोलिस अधीक्षक, निलीमा आरज उपविभागिय पोलिस अधिकारी मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर आडे, सपोनि निलेश शेवळे पोस्टे मंगरुळपीर यांच्या नेतृत्वात, गुन्हे प्रकटीकरण पथक येथे कार्यरत पोउपनि दिनकर राठोड, पोहवा अमोल मुंदे, पोशि मोहमंद परसुवाले, अमोल वानखडे, सुमीत चव्हाण, सुनिल गंडाईत यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!