पोलिस अधिक्षकांचे पथकाचा अवैध धंद्यावर छापा,३३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
पाच अवैध जुगार अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ; एकाच दिवशी ७६ आरोपींसह ३३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त…
वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलाची अवैध धंद्यांवर करडी नजर असून अश्या अवैध धंद्याविरोधात विशेष मोहिमा राबवून सतत कारवाया सुरु असतात. तरीपणकाही असामाजिक तत्व छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश नवनियुक्त पोलिस अधीक्षक अनुज तारे (IPS) यांनी दिले होते त्याअनुषंगाने
पोलिस अधीक्षक अनुज तारे (IPS) यांनी गुप्त बातमीदारामार्फत संकलित केलेल्या माहितीच्या आधारे व आदेशाने पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकाने दि.०४.१२.२०२३ रोजी जिल्ह्यातील पो.स्टे.रिसोडहद्दीत ०२ ठिकाणी जुगार रेड करत २७ आरोपींकडून वरली-मटका साहित्य ०९ मोबाईल, ०४ मोटारसायकली, ०२ टीव्ही संच व नगदी १,१२,१३०/-रु. असा एकूण ४,८२,१३०/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पो.स्टे.मालेगाव हद्दीतील स्वागत हॉटेलसमोरील ठिकाणी जुगार रेड करत २३ आरोपींकडून वरली-मटका साहित्य २० मोबाईल, ०१ चारचाकी व ०१ मोटारसायकल व नगदी १,९०,३००/-रु. असा एकूण २४,२९,९००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतील ग्राम शेलू बाजार येथे जुगार कारवाई करून १४ आरोपींकडून जुगार साहित्य, ०७ मोबाईल व नगदी १,७९,९४०/-रु. असा एकूण २,९७,६४०/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.पो.स्टे.जऊळका हद्दीमध्ये जुगार रेड कारवाई करत १२ आरोपींकडून वरली-मटका साहित्य १० मोबाईल, ०१ मोटारसायकल व नगदी २६,५८०/-रु. असा एकूण १,३९,७७०/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस अधीक्षक .अनुज तारे (IPS) यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने एकाच दिवशी एकाच वेळी ०५ ठिकाणी ‘वरली-मटका-जुगार’ अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापा कारवाई करत एकूण ७६ आरोपींसह ३३,४९,४४०/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपींवर जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे (IPS), अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकाने पार पाडली. सदर कारवाई पथकामध्ये सपोनि.जगदीश बांगर, सपोनि.रमाकांत खंदारे, सपोनि.विजय जाधव, पोउपनि.शब्बीर पठाण यांचेसह पोहवा.विनोद सुर्वे, प्रशांत राजगुरू, गजानन झगरे, गजानन अवगळे, संतोष कंकाळ, दीपक सोनवने, राजेश राठोड, अमोल इंगोले, प्रवीण शिरसाट, पोना. प्रवीण राऊत, ज्ञानदेव मात्रे, राम नागुलकर, गजानन गोटे, आशिष बिडवे, महेश वानखेडे, पोकॉ.निलेश इंगळे, विठ्ठल महाले, विठ्ठल सुर्वे, अविनाश वाढे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व दंगा नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार जितेंद्र राठोड, विष्णू साबळे, प्रल्हाद तागड, राहुल मोरे, सुशील बोरकर, समीर खान, नईम शेख, निरंजन गुंडजवार, राजेंद्र चव्हाण, पंढरी जुमडे, शंकर मेरकर, गणेश पवार, अंकुश जायभाये, अजित खंडाळकर, साहेबराव पट्टेबहादूर, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री इढोळे, पुनम वानखेडे, सुवर्णा गव्हाणे यांचा समावेश होता.
सर्व जनतेस सुजान नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावीत्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.