
सरकारी राशनची काळाबाजारी करणार्यावर वाशिम पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…
वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. परंतु काहीजण कायद्याला न जुमानता त्यांचे गैरकृत्य सुरूच ठेवतात तेव्हा त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना लगाम लावण्यासाठी त्यांच्यावर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येते.
त्याच पार्श्वभूमीवर मंगरूळपीर शहरातील हाफिजपुरा परिसरात राहणारा नफीस खान अजीस खान, वय ४१ वर्षे हा इसम राशनच्या धान्याची काळाबाजारी करत असतो. त्यानुषंगाने त्याचेविरुद्ध पो.स्टे.कारंजा शहर, पो.स्टे.मंगरूळपीर व पो.स्टे.मालेगाव येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत विविध कलमान्वये एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत.


सदर इसम हा वारंवार राशनच्या धान्याची काळाबाजारी करून शासकीय धान्य वितरण प्रणालीतील अत्यावश्यक अन्नधान्य गहू व तांदूळ अवैधरीत्या गोळा करून बाह्य यंत्रणांना विक्री करत असल्याप्रकरणी सदर इसमावर MPDA अधिनियम, १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) चे कलम ३(२) अन्वये ‘अत्यावश्यक वस्तूंची अवैधरीत्या साठेबाजी व काळाबाजार करणारी व्यक्ती’ या सदराखाली सदरचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक .बच्चन सिंह (IPS) यांच्या शिफारशीने तयार करून पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून दि.२५.१०.२०२३ रोजी सदर आरोपींविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश मा.जिल्हादंडाधिकारी यांनी पारित केले आहे. या वर्षातील MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची हि पाचवी कारवाई असून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अश्याप्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जाणार आहे.

सदर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून सदर इसमास स्थानबद्ध करण्यासाठी पोलिस अधीक्षक .बच्चन सिंह (IPS), अपर पोलिस अधीक्षक .भारत तांगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती नीलिमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.दिपक सोनावणे, पोना.प्रवीण राऊत, अमोल इंगोले, महेश वानखडे सर्व नेमणूक – स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व पो.स्टे.मंगरूळपीर येथील पोउपनि.दिनकर राठोड, पोना.अमोल मुंदे, पोकॉ.मोहम्मद परसूवाले यांनी मेहनत घेतली.



