रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस ठाणे पारवा व बाभुळगांव हद्दीतुन अवैधरित्या रेतीची चोरी करुन वाहतुक करणारे  टिप्पर व ट्रॅक्टर विरुध्द केलेल्या कारवाईत केला १३,३५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई….

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १३/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक पांढरकवडा येथुन दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त व पेट्रोलींग।करीता रवाना झाले असतांना पेट्रोलींग दरम्यान पो.स्टे. पारवा हद्दीत असतांना दिनांक १४/०२/२०२४ रोजीचे ०३/०० वा. सुमारास पथकास गोपणीय माहिती मिळाली की, अवैधरित्या रेती वाहतुक करणारे टिप्पर भिमकुंड गावाकडुन पारवा कडे येणार आहे अशी विश्वसनिय माहिती मिळाल्याने पथकाने माहितीची शहानिशा करणे करीता तात्काळ पारवा ते पिंपळखुटी जाणाऱ्या रोडवर ग्राम रामनगर गावाजवळ सापळा लावुन थांबले असतांना पहाटे ०४/४५ वा. सुमारास माहिती प्रमाणे एक टिप्पर येतांना दिसल्याने त्यास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी इशारा देवुन थांबवुन वाहनांची पाहाणी केली असता त्यात गौण खनिज रेती (वाळु) असल्याची खात्री झाल्याने टिप्पर क्रमांक एम.एच.२९ ए.टी. ३९६९ मधील वाहन चालकांस त्यांचा नांव पत्ता विचारला असता त्याने आपले नांव कवडु नागोराव रामपुरे वय ४० रा. घोटी ता. घाटंजी जि. यवतमाळ असे असल्याचे सांगीतल्याने नमुद वाहनांची पाहाणी केली असता टिपर वाहनाचे मागील डाल्यात ०४ ब्रास रेती किमंत २८,००० रु ची अवैधरित्या कोणताही परवाणा नसतांना आढळुन आल्याने वाहन चालकास वाहनाचे मालकास बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचे वाहन हे घाटंजी येथील प्रणव संजय भारती यांच्या मालकीचे असल्याचे सांगुन तो चालक म्हणुन ४०० रु रोजाने काम करीत असल्याचे सांगीतले वरुन नमुद वाहन व त्यातील चोरीची रेती असा एकुण ८,२८,०००/रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नमुद वाहन चालक आरोपी १) कवडु नागोराव रामपुरे वय ४० रा. घोटी ता. घाटंजी जि. यवतमाळ व २) पाहिजे
आरोपी वाहन मालक प्रणव संजय भारती वय ३० वर्ष रा. शिवाजी चौक घाटंजी जि. यवतमाळ यांचे विरुध्द पोलिस ठाणे पारवा येथे
भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे स्थागुशा कडील एक पथक  दिनांक १४/०२/२०२४ रोजी पहाटे सुमारास पो.स्टे. बाभुळगांव परिसरात पेट्रोलींग करीता असतांना पथकास माहिती मिळाली की, ग्राम वाटखेड शिवारातुन ट्रॅक्टरव्दारे अवैधरित्या रेतीची वाहतुक होत आहे अशा माहिती वरुन पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठुन तेथे मिळुन आलेल्या ट्रॅक्टरची पाहाणी केली असता त्यात कोणताही परवाणा नसतांना
अवैधरित्या रेती वाहतुक होत असल्याचे दिसुन आल्याने ट्रॅक्टर चालकास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने आपले नांव किशोर उर्फ राजेंद्र मारोती चव्हाण वय २९ वर्षे रा. नांदुरा पालोती ता. बाभुळगांव असे सांगुन तो ट्रॅक्टरवर चालक असल्याचे व ट्रॅक्टर हा विक्की शंकर पवार वय २८ रा. नांदुरा पालोती यांचा असल्याचे सांगुण त्यांचे सांगणे प्रमाणेचे रेती वाहतुक करीत असल्याचे सांगीतल्याने नमुद इसमाकडुन ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२९ बि.पी. ४२३९ व एक बरास रेती असा एकुण ५,०७,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी चालक १) किशोर उर्फ राजेंद्र मारोती चव्हाण २) पाहिजे आरोपी विक्की शंकर पवार यांचे विरुध्द पो.स्टे. बाभुळगांव येथे भादवि कलम ३७९,३४ व जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ आधारसिंग सोनोने, सपोनि अमोल मुडे, विवेक देशमुख, पोउपनि धनराज हाके, पोलिस अंमलदार बंडु डांगे, सै. साजीद सुनिल खंडागळे, योगेश डगवार, योगेश गटलेवार, रितुराज मेडवे सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी, नरेश राउत, धनंजय श्रीरामे सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!