बनावट चलनी नोटा बाळगणारा मुकुटबन पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बनावट चलनी नोटा बाळगणार्यास मुकुटबन पोलिसांनी घेतले ताब्यात,५७००/-रु च्या बनावट नोटा घेतल्या ताब्यात…..

मुकुटबन(यवतमाळ)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मुकुटबन पो.स्टे परीसरामध्ये अवैध गुन्हे व  गुन्हेगारा विरूध्द मोहीम राबवित असतांना घोन्सा येथे प्रमोद कीशन गाडगे रा.वल्हासा हा बनावट चलनी नोटा ख-या म्हणुन बाजारात वापरण्यासाठी घेउन येणार आहे. अशा गोपनीय माहीती वरून घोन्सा येथे  पोलिस पथक व पंचासह जाऊन सापळा रचुन शिताफीने संशईत ईसम प्रमोद गाडगे  यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन खालील वर्णनाच्या बनावटी चलनी नोटा मिळुन आल्या.
1) 2AC-523552कंमाकाच्या 100 /- रू. च्या 14 बनावट  नोटा एकुण 1400 /- रू
2) 2AC-523553 क्रमांकाच्या 100/- रू.च्या 10 बनावट नोटा एकुण 1000/- रू
3) 6K-420536 क्रमांकाच्या 200/- रू.च्या 09 बनावट नोटा एकुण 1800/-रू
4) 8ND-115032 कंमाकाच्या 500/- रू. च्या 01 बनावट  नोटा एकुण 500 / – रू
5) OKE-130647 क्रमांकाच्या 500/- रूपयाच्या 02 बनावट  नोटा एकुण 1000/- रू.
असा एकुण 5,700 /- रू बनावट नोटा. आरोपी प्रमोद कीशन गाडगे रा.वल्हासा ता.झरी जि.यवतमाळ यांने भारतीय चलनी नोटा
आहे असे माहीत असुन सुध्दा त्या ख-या आहे म्हणुन वापरत आणन्याच्या कपटी उददेशाने जवळ बाळगतांना व त्या ख-या म्हणुन चलनात आणतांना मिळुन आल्याने त्याचे कृत्य कलम
४८९(ब)४८९(क), २४३, भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड,अप्पर पोलिस अधिक्षक,पियुष जगताप,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश
किद्रे ,ठाणेदार मुकुटबन सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण हिरे, ग्रेड पोउपनी खुशाल सुरपाम,पोहवा दिपक ताठे,दिलीप जाधव, शेख
नईम,पोशि संदिप बोरकर, अंकुश बोरकर यांनी केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!