यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका

यवतमाळ – अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल करुन 30 गोवंशीय जनावरे व वाहन सुटका करून एकुण 6 लाख 40 हजार रु. मुददेमाल जप्त केला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, दि.४ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध धंदे व संपत्तीविषयक गुन्हेगारांची माहिती घेणे करीता. मुकुटबन परीसरात पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, गोवंश जातीची जनावरे अवैधरित्या एका पिकअप वाहनामध्ये कोंबुन कत्तलीकरिता आदीलाबाद (तेलंगना) कडे घेवुन जात आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन स्थागुशा कडील पथक माहिती प्रमाणे वाहनाचा शोध घेणेकरीता मुकुटबन ते येडशी रोड ने जात असताना सकाळी ०२/५५ वा सुमारास.रस्त्याचे बाजुला एक पिकअप वाहन क्रमांक TS-10-UB-8687 हे उभे दिसले. पिकअप वाहनाजवळ जावून पाहीले असता तिथे चार इसम उभे दिसले त्या इसमांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी आपले नाव १) फयाम गफार शेख (वय ३२ वर्षे), रा.वार्ड क्र.४,.मुकुटबन, ता. झरीजामणी, २) सद्दम ऊर्फ सय्यद शाकीब सय्यद महमुद (वय ३२ वर्षे), रा.चिखलवर्धा ता.घाटंजी,३) संदीप निंबाजी.सोयाम (वय ४१ वर्षे), रा.पिंपरडवाडी, ता. झरीजामणी, ४) राजु निंबाजी सोयाम (वय २५ वर्षे), रा.पिंपरडवाडी, ता.झरीजामणी असे सांगितल्याने पथकाने पंचासमक्ष सदर वाहनांची पाहणी केली असता वाहनामध्ये गोवंशीय बैल व गोरे दाटीवाटीने व आखुड दोरीने बांधलेले निर्दयतेने व क्रूरपणे चारापाण्याची व्यवस्था न करता कोंबल्याचे दिसुन आले. सदरची जनावरे कोणाची आहेत याबाबत ताब्यातील इसमांना विचारपुस केली असता त्यातील फयाम गफार शेख याने स्वतःची असल्याचे व कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असल्याचे सांगितल्याने सदर वाहनातुन एकुण १३ गोवंशीय जनावरे व वाहन असा एकुण ०४,६५,०००/- रूपयाचा मुददेमाल ताब्यात घेतला. तसेच सदरची कारवाई पोस्टे मुकुटबन येथे नोंद करुन परत जात असतांना पथकाला गोपनीय माहीती मिळाली की, ग्राम खडकी गणेशपुर येथुन काही इसम १० ते १५ बेल कळपाने (पायदळ) मांगली मार्ग तेलंगना राज्यात कत्तली करीता घेवुन जात आहेत. या मिळालेळ्या माहितीची शहानिशा करणेकरीता मांगली चौपाटी येथे थांबुन असताना माहीतीप्रमाणे ०४ इसम हे बैलांना पुराणीने टोचत, काठीने मारत बैलांचा कळप घेवुन येताना दिसले. जवळ येताच त्यांना थांबवुन त्यांचे नाव-गाव विचारले असता त्यांनी आपले नाव १) सचिन महादेव थेरे (वय ३८ वर्षे), रा.तुंड्रा, ता.वणी, २) देविदास नानाजी भोसकर (वय ४५ वर्षे), रा.तुंड्रा, ता.वणी, ३) रमेश शालीकराव पेन्दोर (वय ४१ वर्षे) रा.तुंड्रा, ता.वणी, ४) शत्रुधन नथ्थु घोरफळे (वय ४५ वर्षे), रा. तुंड्रा, ता. वणी असे सांगीतले त्यांना सदरची जनावरे कोणाचे मालकीचे आहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरची जनावरे ही अस्लम कुरेशी व सलीम कुरेशी रा.बेला, जि.आदीलाबाद (तेलंगणा) यांच्या मालकीची असल्याचे सांगुन त्यांचेकडेच पोहोच करीत आहोत असे सांगितले वरुन त्यांचेजवळुन एकुण १७ नग बैल व एक मोबाईल असा एकुण १,७५,०००/ रुपयाचा माल ताब्यात घेऊन आरोपीतांविरुध्द पो.स्टे. मुकुटबन येथे गुन्हा नोंद केला. दोन्ही प्रकरणात मिळून आलेल्या गोवंशीय जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जनावरे ही गौरक्षण संस्थान रासा, ता.वणी येथे ठेवण्यात आले आहेत.



अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, पोनि. स्थागुशा आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोहवा योगेश डगवार, सुनिल खंडागळे, पोना सुधिर पांडे, सुधीर पिदुरकर, पोकों रजनिकांत मडावी, चापोना सतिश फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!