गांजा तस्करी – घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या यवतमाळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एक टोळी हद्दपार

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गांजा तस्करी – घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या यवतमाळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एक टोळी हद्दपार

यवतमाळ – यवतमाळ जिल्हयात चोरी, घरफोडी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाढत्या गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, व सर्व ठाणेदार यवतमाळ जिल्हा यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्णी पो.स्टे कडील पथके अशा गुन्हेगारांचा मागोवा घेत असतांना पथकांनी संयुक्त कार्यवाही करुन दि.१९नोव्हेंबर ते दि. ३१नोव्हेंबर दरम्यान संशयीत इसम नामे शुभम देवानंद वानखडे (वय २२ वर्षे) रा.जिजाऊ नगर आर्णी यास ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने त्याचा साथीदार १) अज्जु उर्फ सोहेल अनिस माकोडे (वय २२ वर्षे), रा.अमराईपुरा आर्णी, २) पवन अविनाश राठोड वय (२२ वर्षे), रा.खेड ह.मु. जिजाऊ नगर आर्णी, ३) शेख कादर उर्फ कलीम शेख छोटु (वय २६ वर्षे),’रा.अमराईपुरा आर्णी, ४) शेख आमीन उर्फ तोत्या शेख छोटु (वय २५ वर्षे) रा.अमराईपुरा, ५) कृष्णा आनंदा वैद्य (वय २४ वर्षे) रा.शास्त्रीनगर आर्णी याच्यासह शहर परिसरात घरफोडी/ दुकान फोडीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन करुन नमुद ०६ आरोपीतांना अटक करुन त्यांचेकडुन आर्णी पो.स्टे. हद्दीतील घरफोडीचे एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन ६,३४,९८० रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.





तसेच सहा.पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद व पोलीस निरीक्षक पो.स्टे. स्टेशन पुसद ग्रामीण यांचे पथकास दिनांक ०४ डिसेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की, ग्राम पारध येथील इसम नामे रमेश शिवराम जाधव रा.पारध हा त्याच्या राहते घरी तसेच त्याचा पुतन्या इंदल हिरालाल जाधव रा.पारध हा सुध्दा अवैधरित्या गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने बाळगुण आहे अशा खात्रीशीर माहिती वरुन ठाणेदार पो.स्टे. पुसद ग्रामीण व त्यांच्या पथकाने पारध येथे माहिती प्रमाणे छापा टाकून कारवाई केली असता ग्राम पारध येथील रमेश शिवराम जाधव व त्याचा पुतन्या इंदल हिरालाल जाधव याचे राहते घरातुन एकुण १३.६८२ किलो ग्राम किंमत २,७२,४४० रु. चा गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळुन आल्याने जप्ती कार्यवाही करुन नमुद आरोपीतांना विरुध्द एन.डी.पी.एस. ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. पुसद ग्रामीण यांच्याकडुन सुरु आहे.



त्याच प्रमाणे दिनांक ०५डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक यवतमाळ येथील कार्यालयात हजर असतांना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सलमान शेख शकील शेख रा. अंबीका नगर यवतमाळ हा त्याचे राखाडी रंगाचे इंडीका कार क्रमांक एम.एच. ३४ ए.ए. ११५७ या वाहनातुन गांजा नावाचा अंमली पदार्थ घेवुन देवगांव वरुन यवतमाळ कडे येत आहे तसेच त्याचे वाहनाचे काचांना काळया रंगाची फिल्म लावली असुन मागील बाजुस इंग्रजी पठाण असे लिहीले आहे. अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पथकाने कायदेशीर बाबींची पुर्तता करुन पोलिस निरीक्षक स्था.गु.शा. आधारसिंग सोनोने यांच्या सह यवतमाळ येथील बाभुळगाव कडुन यवतमाळ मार्ग नागपुर जाणाऱ्या बायपास छापा कारवाई करीता योग्य असलेले ठिकाणी सापळा लावुन थांबुन असतांना माहिती प्रमाणे वाहन इंडीका कार क्रमांक एम.एच. ३४ ए.ए. ११५७ ही आढळुन आल्याने त्यास पथकाचे मदतीने थांबवुन पाहाणी केली असता वाहनामध्ये इसम नामे सलमान शेख शकील शेख (वय २८ वर्षे), रा.अंबीका नगर यवतमाळ व वाहन चालक सलमान शेख ईक्बाल शेख (वय २६वर्षे), रा.सुराणा लेआऊट यवतमाळ हे मिळून आल्याने पंचासमक्ष त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या डिक्कीत एका पोत्यात १५.३७२ किलो ग्राम गांजा किंमत ३,०७,४४० रु चा मिळुन आला त्या नंतर नमुद दोन्ही आरोपीतांची विचारपुस केली असता आरोपी सलमान शेख शकील शेख याने सदरचा माल हा त्याचा असल्याचा व त्याने सदरचा माल हा आनंद शाहु रा.बडगड ओरीसा याच्या माध्यमातुन अनिल यादव नावाचे ट्रक चालकाकडून तळेगांव येथील बायपास वरुन घेतला असल्याचे सांगितले आहे.



नमुद आरोपीकडुन वाहनासह एकुण ६,४२,४४०/- रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी १) सलमान शेख शकील शेख (वय २८ वर्षे), रा.अंबीका नगर यवतमाळ २) सलमान शेख ईक्वाल शेख (वय २६ वर्षे), रा.सुराणा लेआऊट यवतमाळ व पाहिजे आरोपी ३) आनंद शाहु रा.बडगड ओरीसा, ४) अनिल यादव (ट्रक चालक) यांचे विरुध्द पो.स्टे. यवतमाळ शहर येथे एन.डी.पी.एस ॲक्ट अंतर्गत कारवाई नोंद करण्यात आली आहे.

तसेच पोलिस ठाणे कळंब हद्दीतील इसम नामे १) राजपाल शंकरराव नगराळे (वय ४३ वर्षे), रा.बोरगांव (मादनी) ता. जि.यवतमाळ, २) शुदोधन चंद्रमनी चहांदे (वय २१ वर्षे), रा.मेंडला ता.जि. यवतमाळ, ३) अजय पांडुरंग बरडे (वय २६ वर्षे), रा.बोरगांव (मादनी) ता.जि. यवतमाळ या तिघांनीही स्वतःची टोळी बनवुन पोलिस स्टेशन कळंब, बाभुळगांव, यवतमाळ ग्रामीण हद्दीत शेती साहित्य चोरी व इतर चोरीचे गुन्हे केले असल्याने व त्यांचा गुन्हेगारी अभिलेख सन २०२१ पासून असल्याने त्यांचे वाढते गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्या करीता ठाणेदार पोलिस स्टेशन कळंब यांनी त्यांच्या टोळीस हद्दपार करणे संबधाने कलम ५५ म.पो.का.अन्वये प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक यवतमाळ यांना सादर केला होता सदर प्रस्तावासंबंधी प्रकरण चालवुन पोलिस अधीक्षक,यवतमाळ यांनी दि.०४डिसेंबर रोजी १) राजपाल शंकरराव नगराळे (वय ४३ वर्षे), रा.बोरगांव(मादनी) ता.जि.यवतमाळ, २) शुदोधन चंद्रमनी चहांदे (वय २१ वर्षे), रा.मेंडला ता.जि.यवतमाळ, ३) अजय पांडुरंग बरडे (वय २६ वर्षे), रा. बोरगांव (मादनी) ता.जि.यवतमाळ यांच्या टोळीस संपूर्ण यवतमाळ जिल्हा तसेच वर्धा जिल्हयातील देवळी व पुलगांव आणि अमरावती जिल्हयातील धामणगांव, तिवसा या तालुक्यातुन एक वर्ष कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारीत केले आहेत.

सदरची कार्यवाही ही डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलिस अधीक्षक, यवतमाळ, सहा.पोलिस अधीक्षक तथा उपविपोअ पुसद पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्था.गु.शा.आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक पुसद ग्रामीण राजेश राठोड, पोलिस निरीक्षक, पो.स्टे.आर्णी केशव ठाकरे, पोलिस निरीक्षक, दिपमाला भेंडे, पो.स्टे. कळंब, सपोनि विवेक देशमुख, सपोनि गणेश वनारे, स्थानिक गुन्हें शाखा, यवतमाळ व संबंधीत अधिकारी अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!