गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ एलसीबीने केली अटक; पिस्टल अन्…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ एलसीबीने केली अटक; पिस्टल अन्…

यवतमाळ (प्रतिनिधी) – जानेवारी २०२२ मधील एका शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या नंतर गोळीबारातील आरोपींना अटक केली होती. मात्र एक आरोपी पोलीसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्याला पोलिसांनी लोखंडी देशी बनावटीची पिस्टल, मॅग्झीन अन् जिवंत काडतुसासह अटक केली आहे.





या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.१९ जानेवारी २०२२) रोजी फिर्यादी नामे व्यंकटेश संतराम धर्मकारे रा.चसस्टॅन्ड समोर उमरखेड यांनी पोलीस ठाण्यात येवुन तक्रार दिली की, त्यांचे मोठे भाऊ डॉ.हनमंत संतराम धर्मकारे (वय ४२) हे शासकीय कुटीर रुग्णालय उमरखेड येथे कार्यरत होते. ते (दि.११जानेवारी २०२२) रोजी ०४/३० ते ०५ वाजेदरम्यान पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेल समोर मोटरसायकल वर बसुन असताना कोणीतरी अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांचा निघृण खून केला होता. त्यावरुन पोस्टे उमरखेड येथे अप क्रमांक १८/२०२२ कलम ३०२,,१०९,१२० (ब),२१२,२०१ भादंवि सहकलम ३,२५,२७ आर्म ॲक्ट सहकलम ३ (२) (v) अजाज अप्रका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निष्पन्न करुन गुन्हयातील आरोपीतांना अटक करण्यात आली होती. परंतु गुन्हयातील आरोपी नामे अमजद खान सरदार खान रा.वसंतनगर पुसद हा घटना तारखेपासुनच फरार झाला होता. त्या नंतर सुध्दा त्याने सन २०२३ मध्ये पोस्टे. पुसद शहर हद्दीत कलम ३०७,१२० (य), ३२४,५०६,३४ भादंवी अन्वये गुन्हा केला होता. त्या गुन्ह्यात सुध्दा तो अटक टाळण्याच्या हेतुन फरार झाला होता. त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपी अमजद खान सरदार खान याचा कसोशिने शोध घेत असतांना पथकाला गोपनीय माहीती मिळाली की, फरार आरोपी नामे अमजद खान सरदार खान हा उमरखेड शहरामध्ये आलेला असुन त्याच्या जवळ देशी कट्टा आहे. अशा गोपणीय माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ उमरखेड येथे जाऊन आरोपी अमजद खान सरदार खान याचा शोध घेतला तो उमरखेड ते हातगांव कडे जाणाऱ्या रोडवरील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपाजवळ उभा असल्याचे समजले त्या नमुद ठिकाणी जाऊन पाहीले असता आरोपी अमजद खान सरदार खान हा संशयास्पद स्थितीत उभा दिसला त्यास पथकाने ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जिन्स पँटच्या उजव्या बाजुला कमरेला खोसुन एक लोखंडी देशी बनावटीची पिस्टल मॅग्झीनसह मिळुन आली, मॅग्झीनची पाहणी केली असता त्यात ०२ जिवंत काडतुस आढळुन आले वरुन आरोपी अमजद खान सरदार खान (वय ३२ वर्षे) रा.अरुण नाईक ले आऊट पुसद याच्या जवळुन एक देशी बनावटीची पिस्टल किंमत ५००००/- रुपये व ०२ जिवंत काडतुस किंमत २०००/- रुपये व दोन मोबाईल किंमत २४००/- रुपये असा एकुण ५४४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस पुढील कारवाई साठी पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



नमुद आरोपी नामे अमजद खान सरदार खान हा पुसद शहरातील कृख्यात गुंड असुन त्याचेवर यापुर्वी १) पोस्टे पुसद शहर अप क्रमांक ०२/२०२३ कलम ३०७,१२० (ब), ३२४,५०६,३४ भादंवि,२) पोस्टे वसंतनगर अप क्र. ४२०/२०१९ कलम ३,५,२५ आर्म ॲक्ट,३) पोस्टे. वसंतनगर अप क्र. ९५/२०१९ कलम ३०७,३४ भादंवी सह कलम ३,५,२५ आर्म ॲक्ट, ४) पोस्टे पुसद ग्रामीण अप क्र. ७६६/२०२२ कलम ३,२५ आर्म ॲक्ट, ५) पोस्टे पुसद ग्रामीण अप क्र. ३९५/२३ कलम ३,५,२५ आर्म ॲक्ट, असे गुन्हे नोंद आहेत.



सदरची कारवाई ही डॉ.पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष मनवर, पोलीस अंमलदार योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, आकाश सहारे, योगेश टेकाम सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!