
नोकरीचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणारे तिघे गुन्हे शाखेच्या ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने राळेगांव हद्दीतील नौकरी लावुन देतो म्हणून फसवणुक प्रकरणी दाखल गुन्हयात ०४ आरोपींना घेतले ताब्यात…
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन राळेगांव हद्दीतील मातानगर राळेगांव येथे राहणारे पराग दिलीप मानकर वय ३१ वर्ष, यांचे बि.ई. सिव्हील चे शिक्षण झाले असून ते नौकरीचे शोधात होते. त्यांनी सन २०२३ मध्ये सहा. अभियंता या पदाकरीता परिक्षा दिली होती सदर परिक्षेमध्ये ते पास झाले परंतु त्यांचे नांव प्रतिक्षा यादीत होते. त्यादरम्याण पराग दिलीप मानकर यांची ओळख मल्लीकार्जुन पाटील रा. पुणे पांचेसोबत झाली व भेटीगाठी दरम्यान मल्लीकार्जुन पाटील याने पराग मानकर यास स्वतःची वरचे लेवलवर ओळख आहे व तुझी नौकरीची ऑर्डर काढून देतो


असे आमीष दाखवून पराग मानकर यांचेकडुन दि(०४) एप्रिल ते मे २०२४ दरम्यान २१,००,०००/- रुपये उकळले होते. त्यानंतर नमुद मल्लीकार्जुन पाटील रा. पुणे व त्याचे साथीदारांनी पराग मानकर यांना अभियांत्रीकी सहाय्यक गट ब ची बनावट ऑर्डर देवुन त्याचे कडून नागपुर परिसरातील एका रोडचे खोटे खोटेच इन्सपेक्शनही करवून घेतले. त्यावेळी पराग मानकर यांना मोबाईलवर आलेल्या संदेशावरुन मल्लीकार्जुन पाटील व त्याचे साथीदारांविषयी संशय आल्याने त्याने अधिक चौकशी केली असात आपली फसवणूक झाल्याचे त्यांचे लक्षात आल्याने पराग यांनी मल्लीकार्जुन पाटील व त्याचे साथीदारांना आपले पैसे परत द्या असा तगादा लावला परंतु मल्लीकार्जुन पाटील व त्याचे साथीदारांनी त्यास कोणतीही रक्कम परत दिली नाही. त्यामुळे पराग मानकर यांनी दि २४/०७/२०२४ रोजी पो.स्टे. राळेगांव येथे दिलेल्या तक्रारीवरुन मल्लीकार्जुन पाटील व त्याचे साथीदार यांचे विरुध्द कलम ४२०, ४६५,४६८ .४७१.३४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सदर गुन्हयातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी व त्यांचेकडून अधिक कोणी फसविल्या जावु नये या उद्देशाने पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि अजयकुमार वाढवे यांचेकडुन सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी तांत्रीक माहितीचे आधारे आरोपीत १) मल्लीकार्जुन बाबुराव पाटील रा. वाघोली पुणे याचा शोध घेवून त्यास दिनांक ०६/०८/२०२४ रोजी अटक करुन त्याचा मा. न्यायालयाकडुन पोलिस कोठडी रिमांड प्राप्त केला व रिमांड दरम्यान त्याचे इतर साथीदारांबाबत तपास करुन त्याचे साथीदार २) अनुराग उर्फ योगेश सुरेंद्र चव्हाण वय ३३ वर्षे रा. प्रवेश नगर नागपुर, ३) अरविंद माधवराव मोहाडीकर यय ३७ वर्षे रा. नागपुर ४) राहुल कमलप्रसाद रंगारीया वय ४५ वर्षे, रा. नागपुर यांचा ठावठिकाना प्राप्त करुन त्यांना सुध्दा अटक केली असून तपासा दरम्याण नमुद आरोपींकडून फसवणुक झाले रक्कमेमधील एकुण ४,००,०००/- रु ची रोख रक्कम व गुन्हयात वापरलेले किया कंपनीचे चारचाकी वाहन कि. ९,००,०००/- असा एकूण १३,००,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नमुद गुन्हयाचा तपास सुरु असुन यात सहभाग असलेल्या अधिक आरोपींचा कसून शोध सुरु आहे. जनतेला जिल्हा पोलीसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे की, अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप,उपविभागिय पोलिस अधिकारी,पांढरकवडा रामेशवर वैजने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा ज्ञानोबा देवकते,सपोनि अजयकुमार वाढवे, सपोनि विजय महाले, पोउपनि धनराज हाके, पोलिस अंमलदार उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, योगेश डगवार, निलेश निमकर, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, किशोर झेडेकर, अमीत झेंडेकर, बबलु चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, नरेश राउत, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी केली.


