पोलिस असल्याची बतावनी करुन लुटणार्या ईराणी टोळीतील एकास बीड येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत पोलिस असल्याची बतावणी करुन सोन्याचे दागीने चलाखीने चोरी करणाऱ्या टोळीतील एकास निष्पन्न करुन घेतले ताब्यात,गुन्हे शाखा व पांढररकवडा पोलिसांची संयुक्तिक कामगिरी….

पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.( १३)मे  रोजी फिर्यादी नारायण सखलाल जाधव रा.कोंघारा ता. केळापुर हे  नातेवाईकाचे मुलाचे लग्न आटोपुन गावी परत जाण्याकरीता पांढरकवडा करंजी हायवे रोडवरील साखरा गावासमोर रोडवर प्रवासी वाहनाची वाट पाहत असतांना त्याठिकाणी मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी जवळ येवुन हम पोलिस वाले है, तुम अकेले क्यु खडे हो यहाँ आतंकी हमला होने वाला है ” असे म्हणुन फिर्यादीचे हातातील
सोन्याची अंगठी खिशात ठेवण्यास सांगुण फिर्यादी हे अंगठी रुमालात गुंडाळुन खिशात ठेवत असतांना नमुद आरोपींनी
फिर्यादीचे हातातील रुमाल घेवुन फिर्यादीचे खिशात कोंबला व हातचलाखीने सोन्याची अंगठी चोरुन घेतली. व तेथुन पळुन
गेले.अशा फिर्यादी नारायण सखलाल जाधव यांचे तक्रारी वरुन पोलिस ठाणे पांढरकवडा येथे अपराध क्रमांक ५४५/२०२४ कलम १७०, ४१९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास सुरू होता.





पोलिस असल्याची बतावणी करुन हातचलाखीने चोरी करने अशा स्वरुपाच्या घटना इतर ठिकाणी सुध्दा झाल्या असल्याने भविष्यात अशा घटनांची पुनारावृत्ती होवु नये याकरीता पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, व पोलिस ठाणे पांढरकवडा यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु गुन्हयातील अज्ञात आरोपीचे शरीरयष्टी वर्णनाशिवाय कोणताही पुरावा नव्हता तरी सुध्दा पोलिस ठाणे पांढरकवडा व स्थागुशा कडील पथकांनी घटनास्थळ परिसर व आरोपींचे येण्या जाण्याचे मार्ग परिसरातील सिसिटीव्ही फुटेज प्राप्त करुन संशयीत संबधाने गोपणीय बातमीदारांना सतर्क करुन आरोपींचा कसोशीने शोध घेणे सुरु होते. अशातच गोपनीय बातमीदाराकडुन आरोपी हे परळी वैजनाथ येथील शिवाजी नगर ईराणी मोहल्यातील असल्याची माहिती मिळाली त्यावरुन स्था.गु.शा. व पांढरकवडा येथील पथकाने तात्काळ परळी वैजनाथ येथे पोहचुन प्राप्त माहिती व फुटेजवरुन आरोपी अवलाद हुसेन उर्फ मिट्ट हुसेन जाफरी वय २६ रा. शिवाजी नगर ईराणी मोहल्ला परळी वै. जि. बिड यास ताब्यात घेतले असुन त्याने त्याचे इतर तिन साथीदारासह गुन्हा ‘केल्याची कबुली दिली आहे. प्रकरणाचा तपास पांढरकवडा पोलिस स्टेशन पांढरकवडा करीत आहेत



सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक,पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा  रामेश्वर वैजने, पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने,
स्था.गु.शा. यवतमाळ, पोलिस निरीक्षक. दिनेश झामरे पो.स्टे. पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात सपोनि गणेश वनारे स्थागुशा यवतमाळ, पोउपनि योगेश रंधे पो.स्टे. पांढरकवडा व पोलिस अंमलदार मुन्ना आडे, पो.स्टे. वसंतनगर, बबलु चव्हाण, किशोर झेंडेकर, जितेंद्र चौधरी स्थागुशा यवतमाळ व मारोती पाटील, सचिन काकडे, राजु बेलेवार, राजु मुत्यालवार, गौरव नागलकर पो.स्टे. पांढरकवडा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!