स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा जुगारांवर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा यवतमाळ शहर व ग्रामीण हद्दीत कोंबड झुंज तसेच IPL जुगारावर छापा…..

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अवैध धंदयाची गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.





त्यानुसार दिनांक २९/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण हददीतील बिसनी,माथरड शेत शिवारातील विहिरींचे  बाजुला काही इसम कोंबडयाचे झुंजीवर  लोकांकडुन पैसे घेवुन हार जीतचा जुगार खेळ खेळवित आहेत तसेच यवतमाळ शहर हद्दीत माळीपुरा परीसरात एक इसम आयपील सिजन २२ मधील मॅच वर फोन वर सट्टा घेवुन अवैद्य
जुगाराचा खेळ खेळवुन क्रिकेट सट्टा जुगाराचा अड्डा चालवित आहे, अशी माहिती प्राप्त झाली होती त्यावरुन लागलीच ०२ वेगवेगळी
पथके तयार करून छापा कारवाई करीता पाठविली असता पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण हददीत बिसनी माथरड शेत शिवारात कोंबडयांचे
झुंजीवर  हारजीतचा खेळ खेळनारे ०१) आदर्श गजानन उदार वय २७ वर्षे रा. सुभाष वार्ड घाटी घाटंजी २) रवि विठ्ठल भोंग वय २७ वर्षे रा. रा. सुभाष वार्ड घाटी घाटंजी जि.यवतमाळ ३) साहेबराव शामराव चव्हाण वय ४८ वर्षे रा. करळगांव ता. बाभुळगांव जि.यवतमाळ ४) भाऊराव देवानंद धाबेकर वय ५० वर्षे रा. माथरड असे लोक मिळुन आले. त्यांचे अंगझडतीत व डावावर असे १४,४९०/-  रु चार नग कोंबडे रु २०००/-, तिन मोबाईल, तिन मोटार सायकल, चार नग कात्या असे साहित्य व नगदी असा एकुण १,५६,८९०/- रु चा मुददेमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला सदर प्रकरणी पोलिस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.
त्याच प्रमाणे पो.स्टे. यवतमाळ शहर हददीतील माळीपुरा परिसरात आ.पी.एल. सिजन २२ मधिल रॉयल चॅलेंज बेंगलुर विरुध्द कोलकता नाईट रायडर या प्रक्षेपीत होणान्या क्रिकेट मॅच मधील प्रत्येक धावांवर पैशांची बाजी लावुन हार जितचा जुगार खेळ खेळविल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर छापा कारवाई करुन १) पवन कांतीलाल मोर वय ४८ वर्षे रा. माळीपुरा यवतमाळ २)तुषार रवि बजाज वय १९ वर्ष रा. नेहरु चौक मेन लाईन, यवतमाळ असे मिळून आले त्यांचे कडुन वरली क्रिकेट बेटींग करीता उपयोगात येणारे साहित्य चार मोबाईल व नगदी १,५००/-रु  असा एकूण १७,३५०/- रु चा मुददेमाल मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा अधिक तपास पो.स्टे. यवतमाळ शहर हे करीत आहेत.
अशाप्रकारे स्थागुशा कडील पथकाने केलेल्या ०२ वेगवेगळया जुगार अड्ड्यावर छापा कारवाई करुन एकुण ०६ आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडुन एकुण १.७४,२४०/- रु चा मुददेमाल हस्तगत केला असून आरोपी व मुददेमाल पुढील कार्यवाही करीता संबधीत पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.



सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक  पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व त्यांचे पथकांनी यशस्वीरित्या पार पाडली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!